Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लाडक्या लेकीची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा असते. राहाविषयीच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्याने नुकतीच गोव्यामध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात त्याने त्याचे आजोबा राज कपूर यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच लेक राहाबद्दल सुद्धा रणबीरने एक खास खुलासा केला आहे.

गोव्यातील इफ्फी महोत्सवात रणबीर कपूरने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत देशभरात ‘राज कपूर फिल्म फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी त्याने प्रेक्षकांना सांगितलं. यासाठी रणबीरचे काका कुणाल कपूर यांनी ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (NFDC), ‘फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया’ (NFAI) आणि ‘फिल्म हेरिटेज ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज कपूर यांच्या जुन्या चित्रपटांना पुन्हा संग्रहित करण्याचं काम सुरू केलं आहे.

हेही वाचा : “मी परफेक्ट बाबा नाही, पण…”, मोठ्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना; शेअर केले खास फोटो

रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) या प्रोजेक्टबद्दल सांगताना म्हणाला, “अलीकडच्या काळातील तरुणाईला जुन्या दिग्गज कलाकारांबद्दल माहिती नाहीये. आलियाला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तिने मला किशोर कुमार कोण आहेत असं विचारलं होतं. त्यामुळे अशा दिग्गज कलाकारांच्या आठवणी जपण्यासाठी अशाप्रकारचे फेस्टिव्हल खूप महत्त्वाचे ठरतात.” या कार्यक्रमात अभिनेत्याने राहाबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. राज कपूर यांच्या १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनाडी’ चित्रपटातलं ‘किसी मुस्कुराहटों पे हो निसार’ हे गाणं माझ्या सगळ्या आवडतं गाणं असल्याचं रणबीरने यावेळी सांगितलं.

‘किसी मुस्कुराहटों पे हो निसार’ हे गाणं रणबीरने गोव्यात पार पडलेल्या कार्यक्रमात गाऊन सुद्धा दाखवलं. यावेळी तो म्हणाला, “हे माझ्यासाठी अँथम साँग आहे. माझ्या सगळ्यात आवडतं गाणं… माझ्या मुलीला मी सगळ्यात आधी हे गाणं ऐकवलं होतं. हे गाणं आयुष्य जगायला शिकवतं.”

हेही वाचा : “लाखमोलाचं बोलून गेलास…”, Bigg Boss विजेत्या सूरजने शाळकरी मुलांना दिला ‘हा’ सल्ला! सर्वत्र होतंय कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor ) कामाबद्दल सांगायचं झालं, २०२३ मध्ये त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तर, आता येत्या काही वर्षात अभिनेत्याचे ‘रामायण’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ यांसारखे बिग बजेट सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.