“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय | Loksatta

“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रणबीर कपूरने जाहीर केला मोठा निर्णय

“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय
(फोटो – इंडियन एक्सप्रेस)

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट नुकतेच आई-वडील झाले. लेकीच्या जन्माच्या काही दिवसांनीच रणबीर कपूर त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. अलीकडेच त्याने ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या आगामी प्रकल्पांबद्दल काही माहिती दिली.


रणबीर येत्या काळात लव रंजनच्या एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसेल. चित्रपट पुढील वर्षी ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी बोलताना रणबीर महत्त्वाची माहिती दिली आहे. हा आपला शेवटचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असू शकतो, असं रणबीरने सांगितलं.

चित्रपटांमध्ये ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा कधी परतणार? अभिनेता आमिर खान खुलासा करत म्हणाला….


त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, “मला माहित नाही, पण कदाचित हा मी करत असलेल्या शेवटच्या रोमँटिक कॉमेडींपैकी एक असेल. कारण माझं वय वाढत आहे.” ४० वर्षीय रणबीरने त्याच्या कारकिर्दीत अनेक रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यातील शेवटचा २०१७ मध्ये आलेला ‘जग्गा जासूस’ होता.

रणबीर कपूरने सांगितलं नेमकं कसं उच्चारायचं लेकीचं नाव, पाहा व्हिडीओ

दरम्यान, यावेळी त्याने अ‍ॅनिमल चित्रपटाबद्दलही भाष्य केलंय. हा चित्रपट संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाबद्दल पुढे बोलताना रणबीरने सांगितले की तो या चित्रपटात एक ग्रे शेड असलेलं पात्र साकरतोय. दरम्यान, रणबीर कपूर शेवटचा अयान मुखर्जीच्या काल्पनिक महाकाव्य ‘ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा’मध्ये दिसला होता. हा त्याचा पत्नी आलिया भट्टबरोबरचा त्याचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता आणि त्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या कॅमिओ भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:17 IST
Next Story
“स्त्रीप्रधान चित्रपटांना इथे नेहमीच…” तापसी पन्नूने बॉलिवूडबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत