scorecardresearch

रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; अवघ्या काही दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

या चित्रपटाने आयएमडीबी रेटिंगमध्ये शाहरुख खानच्या पठाणला टक्कर दिली आहे

tu jhoothi main makkar day 9 collection
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटातील गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलेल्या रणबीर व श्रद्धाची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

रणबीर व श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाला फायदा झाल्याचं दिसून आलं.तर आता प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. दुसऱ्या गुरुवारी चित्रपटाने ४.७७ कोटी इतकी कमाई करून या चित्रपटाचं नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ९२.६८ कोटी झालं आहे.

आणखी वाचा : “माझी राणी…” किंग खानने केलं ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चित्रपटातील राणी मुखर्जीच्या कामाचं कौतुक

एवढंच नव्हे तर या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन १०३.७५ कोटी इतकं आहे. दुसऱ्याच आठवड्यात श्रद्धा आणि रणबीरच्या या चित्रपटाने १०० कोटीचा टप्पा पार केला आहे. येत्या आठडव्यात हा चित्रपट १५० कोटीचा टप्पाही पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय नुकताच राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट आणि कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

या दोन्ही चित्रपटाशी रणबीर आणि श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ नेमका कशी स्पर्धा देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या चित्रपटाने आयएमडीबी रेटिंगमध्ये शाहरुख खानच्या पठाणला टक्कर दिली आहे. ‘पठाण’ला आयएमडीबीवर १० पैकी ६.४ असं रेटिंग मिळालं आहे तर रणबीर श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी १० पैकी ६.७ असं रेटिंग मिळालं आहे. यामध्ये रणबीर आणि श्रद्धासह डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 11:47 IST