बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. रणबीर आणि श्रद्धाचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. आता रणबीरच्या आगामी ‘अॅनिमल’ची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच सध्या चित्रपटसृष्टीत रिमेकचे वारे घुमत आहेत. अशातच रणबीरने त्याच्या सुपरडुपर हीट चित्रपटाच्या रिमेकबद्दल भाष्य केलं आहे.

रणबीर कपूर, दीपिका पदूकोणचा अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला यावर्षी १० वर्षं पूर्ण होणार आहेत. त्यामुळे नुकतंच या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल रणबीरने भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर अयान मुखर्जीकडे याच्या सीक्वलसाठी एक उत्तम कथानक असल्याचाही रणबीरने खुलासा केला आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : “जागे व्हा, आपल्या ह्या हिंदू धर्माला…” शरद पोंक्षे यांची ‘द केरला स्टोरी’बद्दल मोठी प्रतिक्रिया

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार एका मुलाखतीदरम्यान रणबीर म्हणाला, “मला वाटतं ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचा उत्तम सीक्वल बनेल. मला अजूनही चांगलंच आठवतंय की यासाठी अयानच्या डोक्यात एक छान कथानकदेखील होतं. पण नेमकं त्यावेळी ‘ब्रह्मास्त्र’वरही काम सुरू होतं. मला खात्री आहे की पुढे काही वर्षांनी अयान हा सीक्वल नक्की करेल. १० वर्षांनी नैना, बनी, अवी आणि अदिती यांच्या आयुष्यात नेमके काय बदल घडलेले असणार आहेत हे पाहण्यासाठी सगळेच चांगले उत्सुक असतील.”

आणखी वाचा : पाळीव श्वानाशी इंग्रजीत बोलणाऱ्या प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत; धमाल कॉमेंट करत नेटकरी म्हणाले, “किती पेग…”

हीच गोष्ट २०१८ मध्ये ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना रणबीरने सांगितली होती. खरंच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. आता रणबीर सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. याबरोबरच लवकरच तो ‘ब्रह्मास्त्र २’ आणि ब्रह्मास्त्र ३’वर काम सुरू करणार आहे.