scorecardresearch

“…मी तसा नाही” सोशल मीडियावर नसल्याचं कारण सांगताना रणबीर कपूरचं वक्तव्य

रणबीर इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर यासह इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही.

ranbir kapoor (1)

बॉलिवूडमधील बहुतांशी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात, त्यांना फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांविषयी अपडेट देत असतात. आपल्या चित्रपटांचं प्रमोशनही ते सोशल मीडियावर करतात. खरं तर सोशल मीडियामुळे चाहते आणि कलाकार यांच्यात असणारी दरी कमी होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, असं असलं तरीही काही सेलिब्रिटी अपवाद आहेत. त्याच सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे रणबीर कपूर होय.

एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त दिशा पटानीची खास पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

रणबीर कपूरला बॉलिवूडमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ झाला आहे, पण तो सोशल मीडियावर सक्रिय नाही. रणबीर इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर यासह इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. तो मुलाखती किंवा चित्रपटांचं प्रमोशनही सोशल मीडियावर करत नाही. या टेक्नॉलॉजीच्या युगात जेव्हा सोशल मीडियाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात केला जातोय, तेव्हाही रणबीर सोशल मीडिया का वापरत नाही, याचं कारण त्याने स्वतःच सांगितलं आहे.

‘कच्चा बादाम’च्या गायकाची ‘अशी’ झालीये अवस्था; काम नाही अन् स्वतःचंच गाणं गाताना येतेय अडचण, रडत म्हणाले…

‘तू झुठी मैं मक्कार’च्या प्रमोशन दरम्यान, रणबीर कपूर म्हणाला की, “कोणताही कलाकार एकदा सोशल मीडियावर आला की, त्याला तिथे स्वतःला एका खास पद्धतीने सादर करावं लागतं. तिथे तुम्हाला लोक पसंत करतील, लोकांचं मनोरंजन होईल अशा पद्धतीने स्वतःला सादर करावं लागतं, पण मी तसा नाही.”

स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यामागचे कारण सांगताना रणबीर म्हणाला, “माझा नेहमीच असा विश्वास आहे की आजकाल अभिनेता आणि अभिनेत्रींची मिस्ट्री गायब होत आहे. आम्ही इतक्या जाहिराती, चित्रपट, प्रमोशन, शो करतो, लोक आम्हाला इतकं जास्त पाहत आहेत की त्यांना त्याचा खूप लवकर कंटाळा येतो, त्यामुळे एका कालावधीनंतर यांना हटवून आता नवीन अभिनेता आणा, असं त्यांचं मत होऊ लागतं. त्यामुळे मी शक्य तितकी माझी प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून जेव्हाही माझा चित्रपट येतो तेव्हा लोकांना वाटतं की, खूप दिवसांनी त्याचा चित्रपट येतोय, तर तो पाहून येऊ,” असं रणबीर कपूर म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:57 IST