अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच प्रदर्शित आहे. या चित्रपटचा प्री-टीझन ११ जूनला प्रदर्शित झाला होता. या टीझरच्या माध्यमातून हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढं ढकल्यात आली होती.
हेही वाचा- २०२३ हे वर्षं ठरलं बॉलिवूडसाठी लकी; वर्ष अखेरीपर्यंत हिंदी चित्रपट करणार ‘इतक्या’ कोटींची कमाई




चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील रणबीरचा लूक मध्यंतरी व्हायरल झाला होता. तसेच या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. आता चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रणबीर पांढऱ्या कपड्यात दिसत आहे, आणि त्याचा पांढरा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखला होता, हातावर जखम होती, शिवाय त्याच्या काखेत एक कुऱ्हाड होती. जी रक्ताने माखलेली होती . वाढलेली दाढी आणि केस, रक्ताने माखलेले हात अशा अवतारातही रणबीर पोस्टरवर सिगारेट शिलगवताना दिसला होता. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये रणबीर एकदम डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. अंगात सूट, डोळ्यांवर गॉगल हातात सिगरेट धरलेला रणबीरचा हा लूक प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
हेही वाचा- पंजाबी विकी कौशलची लाडक्या आईसाठी मराठीतून पोस्ट, नेटकरी म्हणाले, “मन जिंकलस आमचं…”
या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका जुन्या मुलाखतीमध्ये संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्त्र असणार आहे असा खुलासाही केला होता.