scorecardresearch

रणबीर कपूरला वाटतं त्याचे ‘हे’ दोन चित्रपट लेक राहाने पाहावेत; नावं सांगत म्हणाला, “मी कदाचित…”

रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे कोणते चित्रपट मुलगी राहाने पाहावेत, यासंदर्भात भाष्य केलं.

ranbir-alia-daughter
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

रणबीर कपूरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या रणबीर व श्रद्धा व्यग्र आहेत. रणबीर चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखती देत आहे आणि त्यात तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह करिअरसंदर्भातील प्रश्नांवरही मनमोकळेपणाने उत्तर देत आहे. रणबीरने गेल्यावर्षी अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केलं आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये ते मुलगी राहाचे पालक झाले.

“वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचं आईला सांगू शकले नाही, कारण…”; खुशबू सुंदर यांचा खुलासा

रणबीरला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे कोणते चित्रपट मुलगी राहाने पाहावेत, अशी त्याची इच्छा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रणबीरने त्याच्या चित्रपटांचं नाव सांगितलं आहे. “मी कदाचित ‘बर्फी’ किंवा ‘जग्गा जासूस’ चित्रपटांची नावं घेईन. मी त्यापासून सुरुवात करेन कारण हे चित्रपट मुलांसाठी अनुकूल आहेत. आम्ही लहान असताना माझी बहीण आणि मी अनेकदा आमच्या आईचा ‘दो कलियां’ चित्रपट पाहायचो. त्यात तिने दुहेरी भूमिका साकारली होती. ती ‘द पॅरेंट ट्रॅप’द्वारे प्रेरित होती. मी कदाचित तो चित्रपटही तिला दाखवेन,” असं रणबीर कपूर म्हणाला.

दरम्यान, रणबीर कपूर व श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने श्रद्धा व रणबीर अनेक शहरांमध्ये चाहत्यांच्या भेटी घेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 09:38 IST
ताज्या बातम्या