scorecardresearch

रणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”

दुबईच्या जेद्दाह येथे सुरू असलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला अभिनेता रणबीर कपूरनेही हजेरी लावली होती

रणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर सक्रिय नसला तरीही चर्चेत मात्र नेहमीच असतो. दुबईच्या जेद्दाह येथे सुरू असलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहेत. आता अभिनेता रणबीर कपूरनेही या फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. हे फेस्टिव्हल १० डिसेंबरला संपणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये बोलत असताना रणबीरने पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रणबीर कपूरने रेड सी फेस्टिव्हलमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ चित्रपटाचं कौतुक केलं. या चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीमचं अभिनंदनही केलं. या फेस्टिव्हलमध्ये बोलताना रणबीर म्हणाला, “कलाकाराला कोणत्याही मर्यादा नसतात. ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’च्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. भविष्यात मला पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करायला आवडेल.”

आणखी वाचा-“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय

फवाद खानच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाने केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले. भारतातही या चित्रपटाबाबत कुतूहल दिसून येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार लवकरच हा चित्रपट भारतातही या चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे असं बोललं जातंय. रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाशी या चित्रपटाची टक्कर होऊ शकते.

आणखी वाचा-रणबीर कपूरने सांगितलं नेमकं कसं उच्चारायचं लेकीचं नाव, पाहा व्हिडीओ

दरम्यान रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाचे आणखी २ भाग आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय रणबीर कपूर लवकरच रश्मिका मंदानाबरोबर ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच त्याच्याकडे लव रंजन यांचा एक चित्रपट आहे ज्यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:39 IST

संबंधित बातम्या