रणबीर कपूरने संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रुद्रावतार धारण करत सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. सिनेरसिक व रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. एक गोष्ट मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे या चित्रपटासाठी रणबीर कपूर हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची पहिली पसंती नव्हता. आधी या भूमिकेसाठी एका दाक्षिणात्य स्टारचा विचार संदीप यांनी केला होता. मीडिया रीपोर्टनुसार 'अॅनिमल' हा चित्रपट सर्वप्रथम दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याला ऑफर झाला होता. आणखी वाचा : १३ वर्षांपूर्वी शाहरुखसह विशाल भारद्वाज बनवणार होते 'हा' चित्रपट, चित्रीकरणही सुरू होणार होतं, पण… सर्वप्रथम संदीप हा चित्रपट तेलुगू भाषेतच बनवणार होते. महेश बाबूने ही भूमिका करायला नकार दिल्याने संदीप रेड्डी वांगा ती घेऊन रणबीरकडे गेले अन् मग हा चित्रपट हिंदीत करायचं नक्की झालं. महेश बाबूच्यामते त्याच्या चाहत्यांसाठी व प्रेक्षकांसाठी हा खूप डार्क चित्रपट आहे आणि त्यांना तो झेपणार नाही म्हणूनच त्याने ही भूमिका नाकारली. संदीप रेड्डी वांगा आणि महेश बाबू यांनी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं. त्यावेळीच त्यांनी महेश बाबूसह काम करायचं ठरवलं होतं. एका मुलाखतीमध्ये संदीप यांनी सांगितल्याप्रमाणे 'अॅनिमल' हा आजवरचा सर्वात हिंस्त्र चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने ७० कोटी इतकं मानधन आकारल्याचीही चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.