scorecardresearch

Premium

‘जवान’ व ‘गदर २’ला मागे टाकत रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; जगभरात कमावले ‘इतके’ कोटी

‘अ‍ॅनिमल’ हा रणबीरच्या करिअरमधला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे

animal-box-office-collection
फोटो : इंडियन एक्सप्रेस

Animal box office collection day 1 : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ अखेर १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षकांची तिच उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली होती. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तर ‘अ‍ॅनिमल’चं अॅडव्हान्स बुकिंग जोरदार झालं होतं.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर परदेशातही जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, भारतात या चित्रपटाने तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी ५०.५० कोटी फक्त हिंदी भाषेत कमावले आहेत. तर १० कोटी रुपये तेलुगू भाषेत कमावले आहेत. उर्वरित कमाई ही कन्नड व मल्याळम भाषेतली आहे.

PM Modi PM Modi on Article 370on Article 370
“हा चित्रपट कसा आहे याबद्दल…”, पंतप्रधान मोदींनी जम्मूमध्ये केला ‘आर्टिकल ३७०’ चा उल्लेख; यामी गौतम म्हणाली…
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
bobby-deol-animal-spin-off
बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी खुशखबर, अब्रार हकवर येणार स्वतंत्र चित्रपट; ‘अ‍ॅनिमल’च्या मार्केटिंग हेडचा मोठा खुलासा
blue-movie-poster
८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला भारताचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट; दोन सुपरस्टार असूनही बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी

आणखी वाचा : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’मधील ‘हे’ तीन वादग्रस्त सीन्स पाहताना प्रेक्षकांना आली किळस; जाणून घ्या त्या सीन्सबद्दल

आता नुकतंच या चित्रपटाच्या कमाईचे अधिकृत आकडे समोर आले आहेत. ट्रेड एक्स्पर्ट रमेश बाला यांच्या रिपोर्टनुसार ‘अ‍ॅनिमल’ने पहिल्याच दिवशी जगभरात ११६ कोटींची छप्परफाड कमाई केली असल्याचं समोर आलं आहे. या रीपोर्टनुसार रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने शाहरुख खानच्या ‘जवान’ व सनी देओलच्या ‘गदर २’लाही मागे टाकलं आहे. कोणतीही मोठी सुट्टी नसलेल्या शुक्रवारी प्रदर्शित होऊन सर्वाधिक ओपनिंग करणारा ‘अ‍ॅनिमल’ हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

‘अ‍ॅनिमल’ हा रणबीरच्या करिअरमधला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे. लोकांची क्रेझ पाहता शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसांमध्ये चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं दिसत आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि समीक्षकांची भरभरून टीका मिळवणाऱ्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दणका उडवून दिला आहे. या चित्रपटात यात रणबीर कपूरने मुलाची तर अनिल कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याशिवाय यात बॉबी देओल रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoors animal box office first day collection movie crosses jawan and gadar 2 first day collection avn

First published on: 02-12-2023 at 16:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×