scorecardresearch

Animal Trailer: ठरलं! ‘या’दिवशी येणार रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर; दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची पोस्ट व्हायरल

टीझरपासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची वाट बघत होते. मध्यंतरी हा ट्रेलर रणबीरच्या वाढदिवशी येणार अशी चर्चा होती

animal-release-date
फोटो : सोशल मीडिया

Animal Trailer Release Date: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

गेले बरेच दिवस रणबीरचे चाहते आणि चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. इ-टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली आहे. यूएसएमध्ये १७२ ठिकाणी या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आत्तापर्यंत परदेशात या चित्रपटाच्या ११०० हून अधिक तिकिटांची विक्री झाली असून यातून या चित्रपटाने १६ लाख रुपयांचा व्यवसाय प्रदर्शनाच्या आधीच केला आहे.

khushboo tawde shared bts video from the set
Video : “कोकणातील संस्कृती, केळीच्या पानावर जेवण अन्…”, लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, पाहा व्हिडीओ…
shubham borade
‘ढोलकीच्या तालावर’च्या निकालावर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “शुभम बोराडेचं विजेता…”
kgf-chapter3
‘केजीएफ ३’च्या रिलीज डेटबद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा; ‘रॉकी भाई’च्या रूपात पुन्हा झळकणार सुपरस्टार यश
salaar-dunki
शाहरुखच्या ‘डंकी’समोर प्रभासचा ‘सालार’ उभा ठाकणार; ट्रेड एक्स्पर्टच्या मते कोणाला बसणार फटका? जाणून घ्या

आणखी वाचा : IFFI 2023: धकधक गर्ल माधुरी दीक्षितला मिळणार ‘हा’ खास पुरस्कार; अनुराग ठाकूर यांनी पोस्ट शेअर करत दिली माहिती

टीझरपासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची वाट बघत होते. मध्यंतरी हा ट्रेलर रणबीरच्या वाढदिवशी येणार अशी चर्चा होती, परंतु ते शक्य झालं नाही आणि पुढे दिवाळी असल्याने ट्रेलर प्रदर्शन लांबणीवर पडलं. आता मात्र प्रेक्षकांना फार वाट पहावी लागणार नाही कारण ‘अ‍ॅनिमल’च्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर हा २३ नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. बरेच दिवस प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर व रश्मिकासह अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ति कपूर, प्रेम चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा सर्वात हिंस्त्र चित्रपट असणार आहे हे संदीप रेड्डी वांगा यांनीच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. १ डिसेंबरला ‘अ‍ॅनिमल’च्या बरोबरच विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’सुद्धा प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoors most awaited animal trailer release date is out now avn

First published on: 20-11-2023 at 17:34 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×