Premium

Video ‘अ‍ॅनिमल’च्या सेटवरील रणबीर कपूरचा नवा लूक व्हायरल; चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ झाला लीक

रणबीर कपूरच्या अगामी चित्रपटातील शुटिंगदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ranbir kapoor
रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट व्हिडीओ लीक (फोटो : इंडियन एक्स्प्रेस )

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. संदीप रेड्डी वनगा यांच्या या सिनेमाची बाजारात जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाबाबत अनेकदा काही ना काही अपडेट येत राहतात. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. आता या चित्रपटातील रणबीरचा नवा लूक व्हायरल झाला आहे. चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटातील रणबीरचा नवा लूक इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यानंतर चाहते त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर एका वर्गात उभा असलेला दिसत आहे. अभिनेत्याने विद्यार्थ्याचा गणवेश परिधान केला आहे आणि तो त्याच्या शिक्षकाशी बोलत आहे.

हेही वाचा- काश्मीरला जाण्यासाठी नीना गुप्तांनी केलेलं लग्न; खुलासा करत म्हणाल्या होत्या…

हा व्हिडीओ ‘रणबीर कपूर युनिव्हर्स’ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. काही सेकंदांची ही क्लिप तुम्हाला या फॅन पेजवर पाहायला मिळेल. हा व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. वयाच्या चाळिशीतही रणबीर खूप गोड दिसत असल्याचे काहींनी म्हटलं आहे.

रणबीरचा ‘ॲनिमल’ चित्रपटातील लूक व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘ॲनिमल’च्या सेटवरून लीक झालेल्या व्हिडीओबाबत, अनेकांनी दावा केला आहे की तो गेल्या वर्षीच्या शूट शेड्यूलचा आहे. ‘ॲनिमल’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदीव्यतिरिक्त तेलुगु, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसह रश्मिका मंदान्नाही दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranbir kapoors video leaked from set of animal actor looks goes viral dpj