scorecardresearch

Premium

लग्नानंतर रणदीप हुड्डाला हवीत ‘एवढी’ मुलं; अभिनेत्याने केला खुलासा म्हणाला…

रणदीप आणि लिन पहिल्यांदा कुठे भेटले होते? घ्या जाणून

randeep and lin
लग्नानंतर रणदीप हुड्डाला हवीत 'एवढी' मुलं

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा नुकताच विवाहबंधनात अडकला. रणदीपने त्याची प्रेयसी लिन लैशरामशी लग्नगाठ बांधली. मणिपूर मध्ये पारंपारिक पद्धतीने दोघांना विवाहसोहळा पार पडला. रणदीप आणि लिनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रणदीप आणि लिन रिलेशनशिपमध्ये होते. आता लग्नानंतर रणदीपने त्यांच्या होणाऱ्या मुलांबाबतही इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा- Kriti Sanon Deepfake Video: बॉलिवूड अभिनेत्रींभोवती डीपफेक व्हिडीओचा विळखा; क्रिती सेनॉनचाही व्हिडीओ व्हायरल

Arbaaz khan ex-girlfriend Giorgia Andriani interviews on breakup unnecessary
दुसऱ्या लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडने दिलेल्या मुलाखतींबद्दल अरबाज खानचा संताप; म्हणाला, “शुराला भेटेपर्यंत मी…”
imran khan wife bushra bibi
निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान तिसऱ्या पत्नीमुळे अडचणीत, कोण आहेत बुशरा बीबी? जाणून घ्या
Irfan Pathan and Safa Baig Wife
इरफान पठाणने पहिल्यांदाच दाखविला पत्नीचा चेहरा; लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट
naved-shaikh-shahrukh-khan
“जेव्हा शाहरुख सिगारेट काढायचा…” पाकिस्तानी अभिनेत्याने सांगितला ‘ओम शांती ओम’च्या सेटवरील ‘तो’ किस्सा

मणिपूरमधील इंफाळ येथे कुटुंबीय जवळचे नातेवाईक मित्रपरिवाराच्या उपस्थितीत रणदीप आणि लिनचा लग्नसोहळा पार पडला. लग्नात दोघांनी मणिपूरमधील पारंपारिक पद्धतीचा पोशाख परिधान केला होता. महाभारतात अर्जुनने राजकुमारी चित्रांगदाबरोबर ज्या ठिकाणी विवाह केला होता त्याच ठिकाणी रणदीपने लिनबरोबर सात फेरे घेतले. लग्नानंतर रणदीपने इच्छा व्यक्त केली आहेत. रणदीप म्हणाला माझ्या दोन इच्छा आहेत. एक म्हणजे खूप मुलं आणि दुसऱी म्हणजे खूप आनंद. मी आणि लिन खूप पूर्वीपासून मित्र आहोत. या मैत्रीला नात्यात बदलून मी आनंदी आहे.”

रणदीप आणि लिन पहिल्यांदा कुठे भेटले होते?

रणदीप व लिनने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण ते दोघे कधीच एकत्र फिरताना किंवा एकत्र पडद्यावरही झळकले नाहीत. रणदीप व लिन यांची पहिली भेट नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली थिएटर ग्रुपमध्ये झाली होती. या ग्रुपमध्ये रणदीप लिनचा सिनिअर होता.

हेही वाचा- ‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान रेखा यांच्या ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ चर्चेत

रणदीपची पत्नी नेमकी करते काय?

गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रणदीपने लिनबरोबरच्या नात्याची पुष्टी केली होती. सोशल मीडियावर लिनबरोबरचे फोटो शेअर करत रणदीपने प्रेमाची कबूली दिली होती. रणदीप हुड्डाची पत्नी लिन मुळची मणिपूरमधील इंफाळ येथील आहे. अभिनेत्रीबरोबरच लिन मॉडेलिंगही करते. लिनने अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे. शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या माध्यमातून लिनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘जाने जान’, ‘रंगून’, ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘हॅट्रिक’ चित्रपटांमध्येही लिन झळकली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Randeep hooda reveals he wants lots of kids ahead of wedding with lin laishram dpj

First published on: 30-11-2023 at 12:59 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×