Premium

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल नवीन अपडेट, रणदीप हुड्डाने केली ‘ही’ मोठी घोषणा

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल नवीन अपडेट, रणदीप हुड्डाने केली ‘ही’ मोठी घोषणा

अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. गेले काही महिने त्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. या चित्रपटाच्या कामात काय प्रगती होत आहे हे वेळोवेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी शेअर केलं आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “माझा अजूनही विश्वास बसत नाही की…”, रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट

अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात स्वतंत्रवीर सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी करत आहे. सुरुवातीला महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. परंतु अचानक यामध्ये मोठा बदल झाला आणि ते या चित्रपटातून बाहेर पडले.

महेश मांजरेकरांनी हा चित्रपट का सोडला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्या जागी रणदीप या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका आणि चित्रपटाचं दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी रणदीपवर आहे.

हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर

आजच त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असल्याची बातमी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी हा चित्रपट लिहिला आहे. रणदीपच्या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २६ मे २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Randeep hooda started shooting for swatantryaveer savarkar film rnv

First published on: 03-10-2022 at 12:56 IST
Next Story
“दिग्दर्शकाला फोन करून सांगितलं ‘ही’ व्यक्तिरेखा स्वीकारून मी चूक… ” आदिपुरुष चित्रपटातील अभिनेता प्रभासने केला खुलासा