Watch These Movies Of Rani Mukerji On OTT : येतात. ओटीटीमुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली असून यामधून गेली अनेक वर्षे फक्त साहाय्यक भूमिका साकारणारे कलाकारही नावारुपाला आले आहेत.
बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या कलाकृतीसुद्धा ओटीटीवर सध्या प्रदर्शित होत आहेत. अनेक जण आता चित्रपटांसह ओटीटीवरील सीरिज व चित्रपटांतून झळकत आहेत. यापैकीच एक म्हणजे राणी मुखर्जी. राणी मुखर्जीने आतापर्यंत अनेक विविध चित्रपटांतून काम करत तिच्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं आहे. तर तिनं अनेक हिट चित्रपटसुद्धा दिले आहेत.
आज राणी मुखर्जीचा वाढदिवस आहे. म्हणूनच राणी मुखर्जीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या तिच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. ओटीटीवर अभिनेत्रीचे कोणते चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहेत याबद्दल जाणून घेऊयात…
ओटीटीवर पाहा राणी मुखर्जीचे ‘हे’ चित्रपट
ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या राणी मुखर्जीच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे तिचा ‘ब्लॅक’ सिनेमा. ‘ब्लॅक’ चित्रपटात राणी मुखर्जी व अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. यामध्ये तिने मुकं बधीर व दृष्टिहीन महिलेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मर्दानी – हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये तिने शिवानी शिवाजी रॉय ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

हिचकी – हा एक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये तिने टॉरेट सिंड्रोम असलेल्या एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपटसुद्धा नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

हम तुम – हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये तिने रिया या स्वतंत्र असलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे.

बंटी और बबली – हा एक कॉमेडी आणि क्राइम या धाटणीचा चित्रपट आहे. एका छोट्या गावातून आलेल्या मुलीची भूमिका राणीने यामध्ये साकारली आहे, जिची स्वप्न खूप मोठी असतात. यामध्ये अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चनही आहेत. हा चित्रपटसुद्धा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

