अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या फारसं बोलत नाही. ती खूप कमी वेळा तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करते. अभिनेत्रीने नुकताच तिच्या गर्भपाताबद्दल खुलासा केला आहे. तो खूप कठीण काळ होता आणि आपण मुलगी आदिराला भावंड देऊ शकत नसल्याची मोठी खंत आहे, असं राणीने म्हटलं आहे. दुसऱ्या बाळाला गमावल्यानंतर आदिराच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचं राणी म्हणाली. 'गॅलाटा इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत राणीने गर्भपाताच्या त्रासदायक अनुभवाबद्दल खुलासा केला. "खरंच, अवघड आहे. मी जवळजवळ सात वर्षे दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न केले. माझी मुलगी आता आठ वर्षांची आहे, ती एक किंवा दीड वर्षांची होती, तेव्हापासून मी दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत होते. शेवटी मी गरोदर राहिले पण मी ते बाळ गमावलं. तो माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. मी तरुण दिसत असले तरी मी फार तरुण नाही," असं राणीने सांगितलं. प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्नानंतर स्वीकारला इस्लाम; घटस्फोट झाल्यावर अभिनेत्याने विदेशी महिलेशी केला निकाह, रमजानबद्दल म्हणाला… राणी पुढे म्हणाली, “मी ४६ वर्षांची आहे, या वयात मी बाळाला जन्म देऊ शकत नाही. मी माझ्या मुलीला भावंड देऊ शकत नाही ही भावना माझ्यासाठी खूप आहे त्रासदायक आहे. या गोष्टीमुळे मला खूप दुःख होतं. पण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवं. माझ्यासाठी आदिरा हिच माझं सर्वस्व आहे आणि मला ती मिळाल्याचा खरोखर खूप आनंद आहे. मी गर्भपाताच्या धक्क्यातून सावरत स्वतःला सांगतेय की होय, आदिरा माझ्यासाठी पुरेशी आहे.” १७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन, अजूनही आहे अविवाहित गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणीने पहिल्यांदा तिच्या गर्भपाताबद्दल सांगितलं होतं. करोना काळात तिचा गर्भपात झाला होता, असा खुलासा राणीने केला होता. 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्व्हे' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपण याविषयी बोलणं टाळलं होतं, कारण लोकांना वाटलं असतं की मी माझ्या गर्भपाताबद्दल बोलून चित्रपटाचं प्रमोशन करतेय, असं राणी म्हणाली होती. राणीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्राशी २०१४ मध्ये एका खासगी समारंभात लग्न केलं होतं. त्यांना मुलगी आदिरा असून ती आठ वर्षांची आहे.