Ranveer Singh Arjun Kapoor Dance : लोकप्रिय दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर हिने रोहन ठक्करशी विवाह केला आहे. कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये लग्नसोहळा पार पडल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या ग्रँड रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडमधील अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यापैकी अभिनेता रणवीर सिंहच्या एनर्जेटिक डान्सची सर्वाधिक चर्चा रंगली आहे.
अंशुला कपूरच्या स्वागत समारंभामधील रणवीरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामधील अर्जुन कपूर व रणवीरच्या खास डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यात रणवीर आणि अर्जुन यांनी त्यांच्या २०१४ मधील ‘गुंडे’ (Gunday) या ॲक्शन चित्रपटातील ‘तुने मारी एंट्रीयाँ’ (Tune Maari Entriyaan) या गाण्यावर एकत्र जबरदस्त डान्स केला. डान्स फ्लोअरवर या दोघांनी धमाल केली असून, अक्षरशः धुमाकूळ घातला. रणवीर व अर्जुनने गाण्याची हूक स्टेप करीत सर्वांचे लक्ष वेधले. अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात सेलिब्रिटींनी उत्साहामध्ये या डान्सचा आनंद लुटला आहे.
अर्जुन कपूर व रणवीर सिंह यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘गुंडे’ चित्रपटात दोघांनीही भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील रणवीर व अर्जुन या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती. त्यानंतर आता पुन्हा एकत्र नाचून त्यांनी डान्सफ्लोर गाजवला आणि ‘गुंडे’च्या आठवणींना उजाळा दिला. आणखी एका व्हिडीओमध्ये रणवीर आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारताना, गप्पा मारताना आणि हास्यविनोद करताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांमधील घट्ट मैत्रीची झलक पुन्हा एकदा दिसून आली आहे.
अर्जून कपूरच्या बहिणीच्या या रिप्सेशन पार्टीमध्ये रणवीर सिंहने त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील गाण्यावरही डान्स केला. ‘धुरंधर’च्या ‘तेरे नाल नचदा’ या गाण्यावर रणवीर आणि उपस्थित पाहुणे नाचताना दिसून आले. रणवीरच्या उत्साहामुळे संपूर्ण समारंभामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूरचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अंशुला कपूरच्या रिसेप्शन पार्टीमधील हे खास क्षण सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Ranveer Singh dancing at Arjun kapoor sister Cocktail party on Tere Naal Nachna Song ??
— Jeet (@JeetN25) July 8, 2026
Bollywood parties are incomplete without OG PARTY STARTER ?
Ranveer attended with full security and avoided paparazzi after receiving threats post dhurandhar.
Wait for his dance moves ? pic.twitter.com/isxNmABiN5
अंशुला कपूर व रोहन ठक्करचे लग्न
अंशुला कपूर हिने सोमवार, ६ जुलै रोजी तिचा बॉयफ्रेंड रोहन ठक्कर याच्याबरोबर लग्न केले. अत्यंत खासगी स्वरूपात झालेल्या या विवाहसोहळ्यानंतर मंगळवारी स्वागत समारंभ पार पडला. या समारंभाला कपूर कुटुंबासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये रेखा, जिनिलिया व रितेश देशमुख, बॉबी देओल, अंजली धवन, दिग्दर्शक अॅटली व त्याची पत्नी प्रिया, रकुल प्रीत सिंग, शबाना आझमी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.
