Ranveer Singh BMW i7 Electric Car: कलाकारांची लाईफस्टाईल कायमच चर्चेचा विषय असते. त्यांचे राहणीमान, त्यांचे कपडे, स्टाईल, लूकमध्ये केलेले बदल तसेच त्यांची आलिशान घरे, गाड्या या सगळ्यांची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. आता रणवीर सिंहने नवीन गाडी घेतल्याने तो चर्चेत आला आहे. अभिनेत्याने कोणती गाडी घेतली आहे, त्याची किंमत काय याबद्दल जाणून घेऊ…

रणवीर सिंहने घेतली नवीन कार

रणवीरला महागड्या आणि आलिशान गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. आता त्याच्या या कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीची भर पडली आहे. अभिनेत्याने नुकतीच BMW i7 ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कार खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर रणवीर सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर त्याची नवीन कार घेऊन शोरूममधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. विशेष म्हणजे, रणवीर स्वतः त्याची नवीन कार चालवत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला.

रणवीरने खरेदी केलेल्या BMW i7 या कारची किंमत २ कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. काही काळापूर्वीच BMW इंडियाने रणवीर सिंहची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती.

रणवीर सिंहच्या कार कलेक्शनमधील ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. यापूर्वी त्याने GMC Hummer EV ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली होती. याबरोबरच, त्याच्याकडे लँबोर्गिनी (Lamborghini Urus), मर्सिडीज (Mercedes-Maybach GLS 600), रेंज रोव्हर (Range Rover) अशा अनेक महागड्या गाड्या आहेत.

दरम्यान, रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘प्रलय’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.