Ranveer Singh Aka Hamza’s Palatial Bungalow In Dhurandhar 2 : आदित्य धर लिखित, दिग्दर्शित व रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. त्यामुळे चित्रपटानं अवघ्या चार ते पाच दिवसांच्या कालावधीतच बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडत कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

‘धुरंधर’ हा एक स्पाय ऍक्शन व थ्रिलर चित्रपट आहे. रणवीर ‘धुरंधर २’मध्ये दुहेरी भूमिकेत आहे. त्यामध्ये तो हमजा व जसकीरत या भूमिका साकारत आहे. पाकिस्तानमध्ये ओळख बदलून गुप्तहेरगिरी करीत असलेला हमजा रहमान डकैतच्या गँगमध्ये सामील होतो आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. यावेळी त्याची यालिनाशी भेट होते आणि तिच्याबरोबर त्याचं लग्नसुद्धा होतं. हे दोघे ज्या बंगल्यात राहताना चित्रपटात दाखवण्यात आलं आहे, तो बंगला अमृतसर येथे आहे. या आलिशान बंगल्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का हा बंगला किती मोठा आहे, आतून कसा दिसतो? चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘धुरंधर २’मधील रणवीर सिंहच्या बंगल्याचे फोटो

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार हा बंगला पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या ‘आनंदा’ या एक एकरच्या प्लॉटवर आहे. २०,००० चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेली ही वास्तुकलेची उत्कृष्ट निर्मिती २०२४ मध्ये पूर्ण झाली. सीक्वेलमधील काही महत्त्वाच्या दृश्यांचं चित्रीकरण या ठिकाणी झालं. त्यात हमजानं घरी दिलेली भव्य पार्टी, त्याची पत्नी यालिना (सारा अर्जुन) त्याच्यावर बंदूक रोखते तो प्रसंग, तसेच त्यांचा शेवटचा एकत्रित सीन यांचा समावेश आहे.

Award Banner
‘धुरंधर २’मधील रणवीर सिंहच्या बंगल्याचे फोटो

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ‘आनंदा’ हे नाव भगवान बुद्धांवरून ठेवण्यात आलं आहे, अंगणात एक मोठं अग्निकुंड आहे आणि २५ फूट उंचीचं सिंहासनासारखं आसन आहे. या अग्निकुंडाभोवती पाहुणे बसून प्राचीन पद्धतीनं एकमेकांशी संवाद साधू शकतात. स्विमिंग पुलाच्या आजूबाजूला केळी आणि बांबूची झाडं आहेत. ही मालमत्ता घरातील आणि बाहेरील जागा, परंपरा आणि आधुनिकता, तसेच मिनिमलिझम आणि मॅक्सिमलिझम यांच्यात सुंदर समतोल साधते.

‘धुरंधर २’मधील रणवीर सिंहच्या बंगल्याचे फोटो

बुद्धांच्या थीमला अनुसरून, अँगकोर शैलीतील एकसंध दगडातून बनवलेल्या चार बौद्ध मूर्ती प्रवेशद्वाराच्या फोयरचं रक्षण करतात. सपाट छप्पर, मोकळं आणि प्रवाही फ्लोअर प्लॅन, तसेच साधी सजावट यांमुळे या मालमत्तेत आधुनिक वास्तुकलेचं अनेक घटक समाविष्ट आहेत. पण त्याच वेळी ती परंपरा आणि संस्कृतीला आदरांजलीही अर्पण करते. कारण- हॉलमधील मिड-सेंचुरी फर्निचर चीनमधून आयात केलेलं आहे.

‘धुरंधर २’मधील रणवीर सिंहच्या बंगल्याचे फोटो

जर एखादा आतमध्ये गेला, तर भूतलावर डबल-हाइट लिव्हिंग रूम, डायनिंग एरिया, आणखी एक लिव्हिंग स्पेस, तसेच मागील अंगणाचं दृश्य असलेली अतिथी बेडरूम आणि सर्व्हिस किचन आहे. मुख्य बेडरूम्स पहिल्या मजल्यावर आहेत, जिथे जिन्याद्वारे पोहोचता येतं. पाहुण्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी या विश्रांती कक्षांच्या तपशिलांना गुप्त ठेवण्यात आलं आहे. अद्याप या बंगल्याची किंमत किती आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

‘धुरंधर २’मधील रणवीर सिंहच्या बंगल्याचे फोटो

रणवीर सिंहच्या चित्रपटातील एखाद्या आलिशान हवेलीला झटपट लोकप्रियता मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ‘गौर मल्बरी मॅन्शन्स’ हे रॉकी और रानी की कहानी या २०२३ मधील हिट कौटुंबिक कॉमेडी चित्रपटात त्याच्या रॉकी रंधावा या पात्राच्या पिढीजात राजवाड्याचं सेटिंग म्हणून वापरल गेलं होतं. सुमारे ३५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ही भव्य मालमत्ता वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसची आठवण करून देते.