'कल्की : २८९८ एडी' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगतात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. रणवीर सिंहने या चित्रपटात त्याच्या पत्नीची दीपिकाची भूमिका कशी वाटली याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'कल्की : २८९८ एडी' चित्रपटात दीपिकाने साकारलेले पात्र गर्भवती आहे आणि खऱ्या आयुष्यातदेखील दीपिका गर्भवती आहे. हा खूप मोठा योगायोग असल्याचे म्हटले जात आहे . त्यावर बोलताना दीपिकाचा पती व अभिनेता रणवीर सिंहने हे माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचे म्हटले आहे. दीपिकाचा असा चित्रपट पाहणे ज्यामध्ये तिचे पात्र गर्भवती आहे आणि खऱ्या आयुष्यातदेखील ती गर्भवती आहे, हे संपूर्ण माझ्यासाठी स्वप्नवत असल्याचे रणवीर सिंहने म्हटले आहे. दीपिका पदुकोनने या योगायोगाबद्दल सांगताना, माझ्या काय भावना असल्या पाहिजेत मला माहीत नाही; पण मी भारावून गेली असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. 'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत, शाश्वत चॅटर्जी यांनीदेखील या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यांनी दीपिकाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. दीपिका नेहमीच हसतमुख असते. चित्रपटात एक प्रसंग असा आहे की, मी दीपिकाचे केस ओढतो. हा शूटिंग शेवटचा भाग होता आणि दीपिका तोपर्यंत गर्भवती होती. त्यामुळे आम्ही हा सीन मुंबईत शूट केला होता. रणवीर सिंहविषयी त्यांनी म्हटले आहे की, या शूटदरम्यान रणवीरदेखील सेटवरती आला होता. त्या दिवशी त्याने केसरी रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याच्याकडे पाहून खूप सकारात्मक वाटले होते. तो एका ठिकाणी थांबू शकत नव्हता. त्या सीनमध्ये खूप हाणामारी होती. त्यामुळे मी रणवीरला सांगितले की, काळजी करू नकोस. ज्या ठिकाणी हाणामारी होणार आहे, त्यासाठी बॉडी डबल आहेत. तो खूप शांत आणि प्रेमळ आहे. मी त्याला असे म्हटल्यावर त्याने हसून मला, माहीत आहे दादा, असा प्रेमळ प्रतिसाद दिला. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाने आतापर्यंत संपूर्ण जगभरात जवळजवळ ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा आकडा पार करील, असा अंदाज केला जात आहे.