पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन उपांत्य फेरीत भारताच्या लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला. लक्ष्य सेन हा पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. आता त्याच्या पराभवानंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने त्याला पाठिंबा देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रणवीर सिंहने इन्स्टग्राम स्टोरीवर लक्ष्य सेनचा एक फोटो शेअर करत, लक्ष्यच्या खेळाचे कौतुक केले आहे. त्याची चपळता, सहनशक्ती, शॉट्सची रेंज, खेळताना त्याने दाखवलेली हुशारी उत्तम असल्याचे त्याने म्हटले आहे. अत्यंत कमी फरकाने हार पत्करावी लागली. मात्र, तो फक्त २२ वर्षाचा आहे आणि त्याने नुकतीच सुरुवात केली आहे. आणखी कोणत्यातरी दिवशी लढ. तुझा अभिमान आहे, असे म्हणत अभिनेत्याने लक्ष्यला टॅग केले आहे.

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Varsha Usgaonkar News
Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांच्या फिटनेसचं रहस्य काय? कॅरीमल कस्टर्ड खात म्हणाल्या, “मी रोज…”
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत

दरम्यान, लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठी ली झी जियाविरुद्ध लढत झाली, पण त्याला १३-२१, २१-१६, २१-११ असा पराभव पत्करावा लागला. लक्ष्यने या सामन्यानंतर बोलताना, मला संधी होती. दुसऱ्या सेटमध्ये चांगला खेळ खेळू शकलो असतो. ली झी जिया उत्तम खेळला, त्याचं श्रेय त्याला आहे. असे म्हटले आहे.

हेही वाचा: Mirzapur Season 3 : मिर्झापूरच्या सिझन ३ मध्ये होणार मुन्ना त्रिपाठीची एंट्री? बोनस एपिसोडचा प्रोमो का चर्चेत?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यचा पराभव झाल्यानंतर माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी स्पर्धकांच्या खराब कामगिरीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटले की, फेडरेशनकडून अधिक गोष्टींची मागणी करण्याऐवजी खेळाडूंनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. त्यांनी स्वत:ला विचारलं पाहिजे की ते पुरेसे कष्ट करत आहेत का? कारण- त्यांच्याकडे सगळ्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत. मला वाटत नाही की, बाकीच्या देशात, अमेरिकेतसुद्धा खेळाडूंसाठी इतक्या सुविधा उपलब्ध असतील.

दरम्यान, रणबीर सिंहच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंहबरोबरच या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, विकी कौशल, रणवीर सिंह, करीना कपूर खान हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाची वाट पाहत असल्याचे वेळोवेळी सोशल मीडियावर पाहायला मिळते याबरोबरच, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ मध्येदेखील तो अभिनय करताना दिसणार आहे.