Rasha Thadani & Madhuri Dixit : ‘झी सिने अवॉर्ड्स’ पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला यंदा बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अनन्या पांडे, तमन्ना भाटिया, रश्मिका मंदाना, कार्तिक आर्यन अशा अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्यात जबरदस्त परफॉर्मन्स सादर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

‘झी सिने अवॉर्ड्स’ सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या सगळ्यात रवीना टंडनच्या २० वर्षांच्या लेकीचा म्हणजेच राशा थडानीचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. पुरस्कार सोहळ्यात राशाने बॉलीवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरला होता.

या सोहळ्यादरम्यान, राशाने बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी व्यक्त केलेला एक अंदाज खरा ठरवला आहे. माधुरीला एका इव्हेंटमध्ये ‘तेजाब’मधील “एक दोन तीन…” हे आयकॉनिक गाणं सर्वात चांगलं रिक्रिएट करून उत्तम डान्स कोण करेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी माधुरीने काही क्षण विचार करून राशा थडानीचं नाव घेतलं होतं. आताच्या नव्या अभिनेत्रींमध्ये राशा “एक दोन तीन…” या गाण्यावर चांगला डान्स करेल असं माधुरीने काही महिन्यांपूर्वीच म्हटलं होतं.

आता पुरस्कार सोहळ्यात माधुरीच्या “एक दोन तीन…” या आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स सादर करून राशाने ‘धकधक गर्ल’चा अंदाज खरा ठरवला आहे. नेटकरी देखील राशाचे कमाल एक्स्प्रेशन्स, तिचा डान्स आणि एनर्जीचं भरभरून कौतुक करत आहेत.

राशा थडानीने “एक दोन तीन…” या गाण्यासह तिची आई रवीना टंडनच्या आयकॉनिक “टिप-टिप बरसा पानी…” या गाण्यावर देखील परफॉर्मन्स सादर केला. राशाच्या नृत्यशैलीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Saraiya (@rohitsaraiya.official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रवीना टंडनची लेक राशा थडानी फक्त २० वर्षांची आहे. यंदा जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘आझाद’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र, या चित्रपटातील ‘उई अम्मा’ गाणं राशामुळे सर्वत्र सुपरहिट झालं आहे.