Chhaava Rashmika Mandanna First Look : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि ट्रेलरची घोषणा ‘मॅडॉक फिम्स’कडून करण्यात आली होती. आता नुकताच ‘छावा’मधील रश्मिका मंदानाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. तर, महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. रश्मिकाचा ‘छावा’ चित्रपटातील पहिला लूक ट्रेलर प्रदर्शनाच्या एक दिवसआधी प्रेक्षकांसमोर रिव्हिल करण्यात आला आहे.

Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारण्यासाठी रश्मिकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. यासाठी मराठी भाषेचं प्रशिक्षण घेतल्याचंही तिने मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. चेहऱ्यावर प्रसन्न करुन टाकणार स्मितहास्य, कपाळी कुंकू, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक ऐतिहासिक दागिने, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असा रश्मिकाचा चित्रपटातील पहिला लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

रश्मिकाचा मराठमोळा लूक तिच्या लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. “श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई सरकार!”, “आमच्या महाराणी येसूबाई…खूपच सुंदर रश्मिका”, “महाराणी येसूबाई सरकार यांची भूमिका साकारणं ही रश्मिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे”, “जय जिजाऊ जय शिवराय…” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.

Story img Loader