Rashmika mandanna revealed she still have good relations with her ex rnv 99 | "मी आजही माझ्या एक्सबरोबर...", रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा | Loksatta

“मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वजण आश्चर्याचकित झाले.

“मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची नेहमी उत्सुकता असते. रश्मिकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिचे लेटेस्ट अपडेट्स देत असते. नुकताच तिने तिच्या पूर्वीच्या अफेअरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “आजच्या हिंदी चित्रपटांतील नृत्य…”, आशा पारेख यांनी व्यक्त केली खंत

अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा असलेला ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती बिझी आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वजण आश्चर्याचकित झाले.

रश्मिकाला मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत विचारलं, “तू एखाद्या पार्टीत तू तुझ्या एक्स बाॅयफ्रेंडला भेटलीस तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?” यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझी माझ्या एक्सबरोबर आजही चांगली मैत्री आहे. मी त्याच्या कुटुंबीयांनाही भेटते आणि मला ते आवडतं. हे काही फार चांगलं नाही, मला माहितेय. पण माझे त्याच्या बरोबरचे संबंध खूप चांगले आहेत.”

हेही वाचा : “आज मी तुमच्यामुळे…”, रश्मिका मंदानाने माधुरी दीक्षितबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

जुलै २०१७ मध्ये रश्मिकाचा रक्षित शेट्टीशी साखरपुडा झाला होता. ‘किरिक पार्टी’ या तिच्या पहिल्या चितरपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी त्यांचं ठरलेलं लग्न मोडलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पदार्पणासाठी बॉलिवूडऐवजी दाक्षिणात्य चित्रपट का निवडला? ऐश्वर्या म्हणाली होती, “मला मणिरत्नम…”

संबंधित बातम्या

‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री
“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा
Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल
करीना कपूर खानने राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये साजरा केला सासूबाईंचा वाढदिवस, एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क
ठरलं! ‘या’ ठिकाणी संपन्न होणार सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!
Maharashtra-Karnataka Border Dispute : “गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज; अशावेळी केंद्र जर मूग गिळून गप्प बसत असेल, तर…” – अंबादास दानवेंचं विधान!
पुणे-लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या १३ डिसेंबरपर्यंत रद्द; लोहमार्गाच्या कामासाठी वाहतूक विस्कळीत
गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; उदय सामंत म्हणाले, “मोदींसमोर कोणी…”
रातोरात आख्खा गावंच मालामाल झाला, १५० हून अधिक जण झाले करोडपती, नेमकं काय घडलं?