Rashmika Vijay Karnataka Reception Look : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. दोघेही काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. रश्मिका व विजय यांनी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने जयपूरमध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर हैदराबादमध्ये दोघांचं रिसेप्शन पार पडलं ज्याला मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नाच्या काही दिवसांनंतर या दोघांनी पुन्हा एकदा रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.
विजय देवरकोंडा हा मुळचा तमिळनाडूचा आहे तर रश्मिका कर्नाटकची आहे. लग्नानंतर हैदराबादमध्ये रिसेप्शन झाल्यानंतर आता कर्नाटकात रिसेप्शन पार पडल्याचं समोर आलेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. यावेळी रश्मिकाने कर्नाटकी पद्धतीचा पोशाख परिधान केला होता. विजयने कर्नाटकातील महिलांचं कौतुक केलं. यावेळी त्याने त्याला कर्नाटक खूप आवडतं असं म्हटले आहे.
रिसेप्शनसाठी रश्मिकाने केला कोडवा स्टाइल लूक
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रिसेप्शनसाठी रश्मिका मंदानाने गुलाबी आणि ऑलिव्ह-ग्रीन रंगाची सिल्क साडी नेसली होती. ही साडी पारंपरिक कोडवा स्टाइलमध्ये नेसली होती. ज्यामुळे एक अस्सल कूर्गी लूक दिसत होता. यावर तिने सोन्याचे दागिने परिधान केले होते. हातात बांगड्या, कानात झुमके आणि गळ्यात आकर्षक नेकलेस. केसांमध्ये गजरा माळला होता. तर विजय देवरकोंडाने रेट्रो स्टाइल लूक केला होता. त्याने काळी फ्लेअर्ड पॅन्ट, पांढरा ओपन-कॉलर शर्ट आणि सिल्व्हर डिटेलिंग असलेला ब्लेझर घातला होता. हा लूक त्याने पांढऱ्या शूजसह पूर्ण केला.
కోడగు రిసెప్షన్లో కూర్గి స్టైల్ చీరలో మెరిసిన రష్మిక మందన్న.. విజయ్ దేవరకొండతో కలిసి ప్రత్యేక ఆకర్షణ!#VijayDeverakonda #RashmikaMandanna #Virosh #Tollywood #Tupaki
— Tupaki (@tupaki_official) April 7, 2026
Follow ? @tupaki_official pic.twitter.com/Z6fJ8zgM1l
विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया
रिसेप्शनदरम्यान विजय देवरकोंडाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्याने कूर्ग (कोडगू) या ठिकाणाशी जुळलेलं त्याचं नातं आणि काही खास आठवणी शेअर केल्या. ते म्हणाले, “पुढच्या वेळी मी इथे आलो तर तिचं बालपण आणि इथलं जीवनशैली पाहायला आवडेल. मी इथे तिसऱ्यांदा आलो आहे. पहिल्यांदा मी माझ्या शाळेतील मित्रांसोबत आलो होतो. कूर्ग हे आमचं पहिलं हॉलिडे डेस्टिनेशन होतं. नंतर मला कळलं की मी तिच्या एका मैत्रिणीच्या घरी राहिलो होतो.”
Cuties ?✨️?#RashmikaMandanna #VijayDeverakonda #virosh pic.twitter.com/0iTx20jE6C
— ? (@viroshily) April 7, 2026
विजय पुढे म्हणाला, “मला हे ठिकाण खूप आवडलं आहे. खूप सुंदर जागा आहे. मी तिला भेटण्याआधीपासूनच मला वाटायचं की कोडगूमधील महिला खूप सुंदर असतात. कूर्गी महिला खूप सुंदर आहेत, आणि मी त्यांच्यातीलच एका मुलीशी लग्न केलं आहे, याचा मला खूप आनंद आहे. तुम्हा सगळ्यांना इथे भेटून खूप छान वाटलं.”
