Rashmika Mandanna Diet Routine : रश्मिका मंदाना भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रश्मिकानं नुकताच दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासह लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रश्मिका मंदाना तिचं काम, फिटनेस यांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रश्मिकानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिचं जेवण-खाणं या आवडी-निवडींबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी तिनं तिला गोड खायला प्रचंड आवडतं; परंतु ती तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमुळे सतत गोड खाऊ शकत नाही आणि तिला फिट राहावं लागतं, असं म्हटलं होतं. परंतु यावेळी तिनं तिचं डाएट रुटीन कसं असतं याबद्दल माहिती दिली होती. रश्मिकाचं डाएट रुटीन कसं असतं, ती दिवसाला काय काय खाते याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
डाएटबद्दल काय म्हणाली रश्मिका?
Tweak india शी संवाद साधताना रश्मिकाला ती फिटनेससाठी काय करते, असं विचारल्यानंतर ती म्हणालेली, “मी बराच वेळ जिममध्ये घालवते. मी खूप व्यायाम करते. मी कार्डिओ वगैरे करत असते.” पुढे तिला तुला नाश्त्याला काय खायला आवडतं, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला पॅन केक खायला खूप आवडतात. फ्रेंच टोस्टही आवडतो; पण मी ते सगळं खाऊ शकत नाहीये. सध्या माझं डाएट चिकन पॅटी, ॲव्होकॅडो, काकडी, कॉफी असं काहीसं आहे. मला फार स्ट्राँग कॉफी आवडत नाही.”
पुस्तकं वाचून करते दिवसाची सुरुवात
रश्मिकाला पुढे तिला कोणते पदार्थ आवडतात, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला गोड खायला खूप आवडतं. मी त्यापासूनच सुरू करते आणि शेवटीसुद्धा तेच खाते.” डेली रुटीनबद्दल रश्मिका म्हणाली, “मी सकाळी लवकर उठू शकत नाही. मला बऱ्याचदा कुठेही जायचं असतं तेव्हा उशीर होतो. मग माझी खूप घाई होते. माझं मॉर्निंग रुटीन असं ठरलेलं नाहीये. मी सकाळी उठल्यानंतर कधी कधी आवडती पुस्तकं वाचते.”
रश्मिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दलच्या अपडेट तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिच्या लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी तिच्या सौंदर्य आणि लग्नातील लूकचं कौतुक होतंय.
