Rashmika Mandanna & Vijay Deverakonda Video : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघांनी २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशातच आता लग्नानंतर रश्मिका विजयसह त्याच्या मूळ गावी गेली आहे. तिथे अभिनेत्रीचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
रश्मिका व विजय यांनी पारंपरिक पद्धतीने जवळच्या व्यक्तींच्या साक्षीने थाटामाटात लग्न केलं. त्यानंतर दोघे कुटुंबीयांसह विजयच्या हैदराबाद येथील घरी गेले. लग्नानंतर दोघांनी देवदर्शन घेतलं. दोघांचे हैदराबाद येथील देवदर्शनाला गेल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. लग्नानंतर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना मिठाईची पाकिटं वाटली आहेत. अशातच आता हे दोघे तेलंगणा येथील थुम्मनपेट येथे गेले आहेत, जे विजयचं मूळ गाव आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार येथे त्याचं एक फार्महाऊस आहे, ज्याची हे दोघे पूजाही करणार आहेत.
सासरी रश्मिकाचं झालं स्वागत
विजय लग्नानंतर रश्मिकाला घेऊन त्याच्या गावी गेल्यानंतर तिथे त्यांचं जंगी स्वागत झाल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. यावेळी रश्मिकाने राखाडी रंगाची साडी नेसली अजून त्यावर साजेसे दागिने परिधान केले आहेत, तर केसात सुंदर असा गजराही माळला आहे; तर विजयने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांनी यावेळी पारंपरिक लूक केला आहे. गावी गेल्यानंतर गावकरी त्यांना ओवाळून त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. यावेळी दोघांनी तिथे असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शनही घेतलं आहे. दोघांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Vijay Deverakonda and Rashmika Deverakonda at Thummanpet- Telangana ? ❤️?#Virosh pic.twitter.com/WTxP8QxFnI
— THE SUKUMAR (@__sukumar___) March 2, 2026
उदयपूरमध्ये लग्न केल्यानंतर रश्मिका व विजय देवदर्शन करण्यात व्यग्र आहेत. त्यानंतर या जोडीचं रिसेप्शनही पार पडणार आहे. ४ मार्चला हैदराबादमध्ये रश्मिका व विजयचं रिसेप्शन आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार या रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत. यावेळी दोघांच्या रिसेप्शनला सामान्य माणसांना त्या दिवशी गर्दी आणि ट्रॉफिकमुळे कुठली समस्या होऊ नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं असल्याचं विजय देवरकोंडाच्या टीमकडून कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, रश्मिका व विजय यांच्या लग्नानंतर त्यांच्या ‘रणाबल्ली’ या आगामी चित्रपटाचं पहिलं गाणंसुद्धा प्रदर्शित करण्यात आलं आहे. अजय-अतुल यांनी त्याला संगीत दिलं आहे. याचवर्षी ११ सप्टेंबरला त्यांचा हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. लग्नानंतर दोघे पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत.
