Actor Tanuj Virwani with wife Tanya Jacob : एकेकाळी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करून चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्री लवकरच आजी होणार आहेत. रतीचा मुलगा व अभिनेता तनुज विरवानी बाबा होणार आहे. तनुजने काही महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंड तान्या जेकबशी लग्न केलं होतं, आता या जोडप्याने गूड न्यूज दिली आहे.

तनुज विरवानी हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘वन नाइट स्टँड’, ‘पुरानी जीन्स’, ‘योद्धा’, ‘कोड एम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तनुज नुकताच पत्नी तान्याबरोबर एका इव्हेंटला आला होता, तेव्हा तान्याच्या बेबी बंपने लक्ष वेधून घेतले. विरल भयानीने त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नानंतर आठ महिन्यांनी या जोडप्याने आनंदाची बातमी दिली आहे.

तनुजने नुकतेच बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तनुज, तान्या, रती अग्निहोत्री व इतर काहीजण दिसत आहेत.

तनुज विरवानी आणि तान्या जेकब यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी लोणावळ्यात लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाला रित्विक धनजानी आणि निक्की तांबोळी यांच्यासह इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. लग्नात तनुज व तान्या यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळला होता. इतकेच नाही तर रती अग्निहोत्रीदेखील मुलाच्या लग्नात थिरकताना दिसल्या होत्या.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

३७ वर्षीय तनुज हा रती अग्निहोत्री व त्यांचे पूर्वाश्रमीचे पती अनिल विरवानी यांचा एकुलता एक मुलगा आहे. रती व अनिल यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. नंतर ३० वर्षांनी त्यांनी २०१५ साली घटस्फोट घेतला होता. रती या मुलगा तनुज व सून तान्याबरोबर राहतात.

प्रसिद्ध अभिनेत्री कामावर जाण्याआधी जुळ्या मुलांबरोबर घालवतेय वेळ, फोटो शेअर करत म्हणाली…

रती अग्नीहोत्रींनी ३० वर्षांच्या संसारानंतर घेतलेला घटस्फोट


८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रती अग्निहोत्रींनी बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पुडिया वरपुकल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यांनी १९८१ मध्ये ‘एक दुजे के लिए’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर अभिनेत्रीकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. रती अग्निहोत्रींनी करिअरच्या शिखरावर असताना बिझनेसमन अनिल वीरवानीशी १९८५ मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या संसारात कायम भांडणं झाली. २०१५ मध्ये रती अग्निहोत्रींनी पती अनिल विरवानी यांच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. यासोबतच त्यांनी पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल करून घटस्फोट घेतला होता.