scorecardresearch

Premium

“माझ्या मुलीने किसिंग सीन दिला तर…”, रवीना टंडनने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “जर ती…”

रवीना टंडन हिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिने तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण करिअरमध्ये कधीही कुठल्या चित्रपटामध्ये किसिंग सीन दिलेला नाही.

raveena daughter

अभिनेत्री रवीना टंडन गेली अनेक दशकं आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तिचे चित्रपट पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. कारण तिचा प्रत्येक चित्रपट हा नावीन्यपूर्ण असतो. कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत असते आणि याचं एक कारण म्हणजे तिची मुलगी राशा थडानी. रवीनाने आतापर्यंत कधीही ऑनस्क्रीन किसिंग सीन दिलेला नाही. पण तिच्या मुलीने जर ऑनस्क्रीन एखाद्या अभिनेत्याला किस केलं तर रवीनाला हे चालेल का हे तिने स्वतः सांगितलं आहे.

रवीना टंडन हिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण तिने तिच्या आतापर्यंतच्या संपूर्ण करिअरमध्ये कधीही कुठल्या चित्रपटामध्ये किसिंग सीन दिलेला नाही. पण जर भविष्यात तिच्या मुलीने ते केलं तर रवीनाची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल तिने भाष्य केलं आहे.

Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
akshay-kumar-new-film
नव्या चित्रपटाची घोषणा करून अक्षय कुमारने मोडला स्वतःचाच नियम; नेटकरी म्हणाले, “५० कोटीसुद्धा…”

आणखी वाचा : “…म्हणून प्रत्येक गाडीची नंबर प्लेट सारखीच,” रवीना टंडनने अनेक वर्षांनी केले गुपित उघड

नुकत्या लेहेरे रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “जर ती स्वतः कम्फर्टेबल असेल तर काय हरकत आहे? पण जर ती कम्फर्टेबल नसेल तर तिला मनाविरुद्ध कुठलेही गोष्ट करण्यासाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.” तर आता रवीनाचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : “तो मला रक्ताने पत्र लिहायचा…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा

दरम्यान, रवीनाची मुलगी राशा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर यांच्या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे. दुसरीकडे ती तिचं शिक्षणही पूर्ण करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raveena tandon opens up about what will be her reaction if her daughter give kissing scene rnv

First published on: 29-09-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×