१९९४ साली प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. अक्षयकुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी यांचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि सुपरहिट गाणी यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यातही यातील ‘टिप टिप बरसा पानी…’ या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं. आजही या गाण्याचे रिमेक करून त्यावर थिरकायचा मोह कोणालाच आवरता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गाण्यातील अक्षयकुमार, रवीना टंडन यांच्या सुपरहॉट केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली. खासकरून या गाण्यामुळे रवीनाला एक वेगळीच ओळख मिळाली. परंतु या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी रवीनाने बऱ्याच अटी घातल्या होत्या. नुकतंच एका मुलाखतीमध्ये रवीनाने या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से शेअर केले.

आणखी वाचा : साबरमती एक्स्प्रेस, कोच S6, ५९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू अन्… आगामी ‘गोध्रा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘द न्यू इंडियन’शी संवाद साधताना रवीना म्हणाली, “ही गाणी कामुक जरी असली, तरी त्यात कोणतीही मर्यादा ओलांडलेली नव्हती. तुम्ही तुमच्या हावभावातूनही कामुकता दाखवू शकता, मग साडी परिधान केली आहे की अन्य काही याचा अजिबात फरक पडत नाही. या सगळ्या गोष्टी डोळ्यांत दिसतात आणि यालाच अभिनय म्हणतात.” या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान बऱ्याच ठिकाणी रवीना थोडी अवघडली होती. रवीना सर्वप्रथम या गाण्यावर काम करण्यास साशंक होती पण नंतर तिने याच्या चित्रीकरणादरम्यान काही अटीदेखील घातल्या होत्या.

याविषयी बोलताना ती म्हणाली, “माझ्या डोक्यात काही गोष्टी खूप स्पष्ट होत्या. मी गाण्यात साडी सोडणार नाही, कोणताही इंटिमेट सीन देणार नाही, अश्लील हावभाव करणार नाही, कीसदेखील करणार नाही, या गोष्टी मी आधीच सांगितल्या होत्या. याबाबतीत बरीच चर्चा केल्यानंतर आम्ही हे गाणं सादर करू शकलो. या गाण्यातून केवळ कामुकताच दर्शवण्यात आली आहे.” या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान रवीनाला १०२ डिग्री ताप होता. त्या वेळी पावसाची काहीच लक्षणं दिसत नसल्याने कृत्रिम पावसाची सोय करण्यात आली आणि हे आयकॉनिक गाणं तयार झालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon put these conditions before shooting of iconic tip tip barsa pani avn
Show comments