बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही तिचा अभिनय तेवढाच ताकदीचा आहे. रवीनाचे वडील रवी टंडन त्याकाळी खूप मोठे दिग्दर्शक होते. त्यामुळे रवीनाला बॉलिवूडमध्ये फारसा संघर्ष करावा लागला नाही. मात्र तिला बॉडी शेमिंगला बरेचदा सामोरं जावं लागलं. चित्रपटसृष्टीतील लोकांकडून शरीराबद्दल टोमणे ऐकावे लागले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने बॉडी शेमिंगबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

रवीनाच्या मते त्या काळात गॉसिप मासिकांमध्ये अशा गोष्टी लिहिल्या जायच्या ज्यामुळे एखाद्या अभिनेत्रीचं करिअर उध्वस्त होऊ शकतं. रवीना बॉलिवूडच्या सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण तिलाही या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल याची कोणाला कल्पनाही नसेल. एक काळ असाही होता ज्या वेळी रवीनाच्या शरीरावरून तिला बोललं गेलं. तिच्याबद्दल वेगवेगळी मतं बनवली गेली.

Sourav Ganguly's Reaction to Rohit's Leadership
Sourav Ganguly : “…म्हणून मी रोहित शर्माला कर्णधार बनवलं होतं”, सौरव गांगुलीचा ‘हिटमॅन’बद्दल मोठा खुलासा
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण

आणखी वाचा- सलमान खानच्या वडिलांच्या आयुष्यात ‘महाभारता’ला आहे खूपच महत्त्व, लग्नानंतर का पडलं ‘शंकर’ हे नाव?

रवीना म्हणाली, “९० च्या दशकातील मासिकं खूपच वाईट होती. त्यातील काही महिलांना मी आजही पाहते ज्या स्वातंत्र्याचं बिरुद मिरवताना दिसतात. या त्याच महिला आहेत ज्या त्या काळातील अभिनेत्रीच्या शत्रू होत्या. याच महिला त्या काळात सर्वात जास्त बॉडी शेम करायच्या. एखाद्या अभिनेत्रीला लाजिराणं वाटावं यात त्या काहीच कमी पडू द्यायच्या नाहीत. आता याच महिला स्त्रीवादी म्हणून आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांच्याबद्दल जर मी बोलायला सुरू केलं तर शब्दही कमी पडतील.”

रवीना पुढे म्हणाली, “मी सुद्धा त्या काळात बॉडी शेमिंगचा सामना केला आहे. त्यावेळी माझ्याबद्दलही बरंच काही उलट-सुलट बोललं गेलं. कधी माझ्या मांड्यांवर ‘थंडर थाइज’ सारख्या कमेंट केल्या गेल्या. कधी मला मी अशीच, मी तशीच तर कधी मी ९० किलोंची असंही बोललं गेलं. त्यावेळी मी जाड होते. वयाच्या १६ व्या वर्षी मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा मी जाड होते आणि अर्थातच मला याने काही फरक पडला नाही. मी जशी आहे तसंच राहायला मला आवडतं.”

आणखी वाचा- संजय दत्तवर होतं रवीना टंडनचं क्रश, खुलासा करत म्हणाली, “त्याने मला नेहमीच…”

दरम्यान या सर्व गोष्टींना कंटाळून रवीनाने त्यावेळी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला आणि अनिल थडानीशी लग्न केलं होतं. पण त्यानंतर तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत धमाकेदार कमबॅक केलं. सध्या ती ओटीटीवर खूपच लोकप्रिय आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’मध्ये दिसली होती आणि आता ती ‘केजीएफ ३’ आणि ‘घुडचढी’मध्ये दिसणार आहे.