Premium

रवीना टंडनची मुलगी राशा लवकरच करणार अभिनय क्षेत्रात पदापर्ण? २२ वर्ष मोठ्या ‘या’ अभिनेत्याबरोबर करणार काम?

राशाच्या अभिनय क्षेत्रात पदापर्णावर रविना म्हणालेली…

raveena-tandons-daughter-rasha
रविना टंडनची मुलगी राशा लवकरच करणार चित्रपटात पदापर्ण

अभिनेत्री रवीना टंडन नेहमी चर्चेत असते. गेली अनेक दशकं आपल्या अभिनयातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. रवीनाप्रमाणे तिची मुलगी राशाही थडानीही सतत चर्चेत असते. रवीनाप्रमाणे राशाचाही चाहतावर्ग मोठा आहे. राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ती अपडेट देत असते. आता राशा लवकरच आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदापर्ण करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मी १२ वर्षाचा नाही…” ; मुलगा आरवकडे खात्याच्या पासवर्डची मागणी करताच ट्विंकल खन्नाला मिळालेलं उद्धटपणे उत्तर, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

मिळालेल्या माहितीनुसार राशा साऊथचा सुपरस्टार राम चरणबरोबर एका साऊथ चित्रपटात झळकणार आहे. राम चरणचा हा चित्रपट ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जाणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक बुची बाबू सना करणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असेल. मात्र, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निर्माते लवकरच या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राशाने ऑनस्क्रीन किसिंग सीन दिल्यावर प्रतिक्रिया काय असेल याबद्दल रवीनाने नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. रविना म्हणालेली. “जर ती स्वतः कम्फर्टेबल असेल तर काय हरकत आहे? पण जर ती कम्फर्टेबल नसेल तर तिला मनाविरुद्ध कुठलेही गोष्ट करण्यासाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.”

हेही वाचा- Video “आपण निरोप घेऊ शकलो नाही पण…”; सुशांतच्या आठवणीत दिशा पटानी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

एका मुलाखतीत रविनाला राशाच्या बॉलीवूड पदापर्णाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रविना म्हणालेली, तिला चित्रपटांमध्ये काम करायचं असेल तर ती करु शकते पण त्याअगोदर तिला आपण शिक्षण पूर्ण करण्याची गरज आहे. जेणेकरुन ती आपल्या पायावर उभी राहू शकेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raveena tandons daughter rasha thandani to mark her debut opposite rrr star ram charan dpj

First published on: 01-10-2023 at 18:27 IST
Next Story
“मी १२ वर्षाचा नाही…” ; मुलगा आरवकडे खात्याच्या पासवर्डची मागणी करताच ट्विंकल खन्नाला मिळालेलं उद्धटपणे उत्तर, अभिनेत्रीने सांगितला किस्सा