Madhuri Dixit : माधुरी दीक्षितबरोबर काम करायला मिळावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. अनेक जण तिच्या कामाचं कौतुक करत असतात. अशातच आता ‘मां बहन’ चित्रपटातील तिच्या सहअभिनेत्याने रवी किशन यांनी तिचं कौतुक केलं आहे. तिच्याबरोबर काम करण्यापूर्वी त्यांना काहीच सुचत नव्हतं असं त्यांनी सांगितलं आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रवी किशन यांनी माधुरी दीक्षितबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत तिचं कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितने सेटवर कधीच कुठल्या गोष्टीसाठी तक्रार केली नाही असं म्हटलं आहे. माधुरीबद्दल रवी किशन नेमकं काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊयात…

रवी किशन यांनी केलं माधुरी दीक्षितचं कौतुक

माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यापूर्वी आपण किती घाबरलो होतो, याची आठवण सांगताना रवी किशन यांनी सांगितलं की, अनेक वर्षांपासून ते माधुरीचे चाहते आहेत. त्यामुळे तिच्यासमोर अभिनय करताना आपण कसं काम करू, याची त्यांना काळजी वाटत होती. ते माधुरीबद्दल म्हणाले, “माधुरीबरोबर काम कसं करायचं आणि संवाद कसा साधायचा या विचारात होतो. कारण मां बहनपूर्वी कधीच तिच्याबरोबर काम केलं नव्हतं”.

रवी किशनने केलं माधुरीचं कौतुक

रवी पुढे म्हणाले, “माधुरीबरोबचे माझे सीन खूपच गंभीर आणि भावनिक होते. यापूर्वी मी कधीही अशा प्रकारचं पात्र साकारलं नव्हतं. तसंच, माधुरीलाही मी याआधी अशा भूमिकेत पाहिलं नव्हतं. तिचे ते हावभाव आणि पडद्यावर निर्माण केलेलं वेगळंच जादुई वातावरण पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित होतील.” रवी किशन यांच्यामते, या भूमिकेत माधुरी दीक्षितने स्वतःची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली आहे, जी याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती.

रवी यांच्यामते, माधुरी दीक्षितच्या पडद्यामागील स्वभावच त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव टाकून गेला. ते म्हणाले की, सेटवर उशीर होणे, खराब हवामान किंवा अचानक निर्माण झालेल्या अडचणी यांचा माधुरीवर कधीच परिणाम होत नाही. “माधुरी कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाही. पाऊस पडत असो किंवा चिखल असो, मी तिला कधीही तक्रार करताना किंवा नाराजी व्यक्त करताना पाहिलं नाही. पाऊस जास्त पडो किंवा कमी, त्या नेहमी शांत आणि आनंदी असते.”

रवी किशन पुढे म्हणाले, “तिने तिचं एक जग निर्माण केलं आहे. ती त्यामध्ये रमलेली असते. पाऊस पडला, वारा आला तरी ती शांतच असते आणि तिच्या सहकलाकारांचं निरीक्षण करत असते. ती खूप शांत आणि आनंदी स्वभावाची आहे.