scorecardresearch

शाहरुख खानच्या ‘पठाण’ची किली पॉललाही भूरळ; गायलं ‘बेशरम रंग’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

Video: किली पॉलने गायलेलं ‘बेशरम रंग’ गाणं व्हायरल

kili paul besharam rang song
किली पॉलचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षीत व बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीच बेशरम रंग गाण्यामुळे ‘पठाण’ चित्रपट चर्चेत होता. गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे दीपिका पदुकोण व शाहरुख खानला ट्रोलही करण्यात आलं होतं. ‘बेशरम रंग’ गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं.

वाद निर्माण झालेल्या या ‘बेशरम रंग’ गाण्याची भूरळ रील स्टार किली पॉललाही पडली आहे. किली पॉलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल बहीण नीमा पॉलसह ‘बेशरम रंग’ गाणं गाताना दिसत आहे. किली पॉलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> Video: हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल, नेटकरी म्हणाले “उर्फी जावेद…”

किली पॉल दक्षिण आफ्रिकेच्या तंजानियामधील एक प्रसिद्ध रील स्टार आहे. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून त्याचे इन्स्टाग्रामवर ४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. किली पॉल भारतीय गाण्यावर रील बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवले आहेत.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या दिग्दर्शकाने दिली गूड न्यूज, घरी चिमुकल्याचं आगमन

किली पॉलला भूरळ पाडलेल्या ‘बेशरम रंग’ गाणं असलेला पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने सात दिवसांत देशांतर्गत ३२८ कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 12:41 IST