रेणुका शहाणे हे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतीलही नावाजलेले नाव आहे. मोठ्या पडद्याबरोबरच टेलिव्हिजनवर काम करून रेणुका शहाणे प्रेक्षकांच्या घरातल्याच एक बनल्या. आज त्यांचा वाढदिवस. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण त्यांच्या ‘हम आपके है कौन…!’ या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे. हा चित्रपट आजही प्रत्येकजण तितक्याच आवडीने बघतात.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

‘हम आपके है कौन…!’ या चित्रपटात रेणुका शहाणे यांचा एक सीन शूट करायचा होता. या सीनमध्ये रेणुका शहाणे यांना पायऱ्यांवरून पडताना दाखवायचे होते. या सीननंतर चित्रपटात त्यांचा मृत्यू होतो. सेट तयार करण्यात आला. हा सीन शूट करताना रेणुका यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची सगळी काळजी घेण्यात आली होती.

चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. रेणुका शहाणे यांनीही हा सीन उत्तमप्रकारे दिला. या संपूर्ण सीनचे शूटिंग बघत असताना या चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रीमा लागू यांच्या डोळ्यात अश्रू होते. सीन संपल्यानंतर जेव्हा दिग्दर्शकाने कट दिला, तेव्हाही रीमा लागू यांना अश्रू अनावर होत होते. सीन संपल्यावर बराच वेळ त्या ढसाढसा रडत होत्या. त्यानंतर शेवटी रेणुका शहाणे यांनी स्वतः रीमा लागू यांच्याजवळ जात त्यांची समजूत काढली. तसेच सीन शूट करताना त्यांना कुठेही दुखापत झाली नाही असे सांगत त्यांना शांत केले.

हेही वाचा : “हम आपके है कौन? या चित्रपटामुळे मी…”, रेणुका शहाणे रमल्या जुन्या आठवणीत

‘हम आपके है कौन..!’ हा चित्रपट रेणुका शहाणे यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या चित्रपटामुळे तिला साधेपणाचा अर्थ आणि त्याची किंमत कळून आली, असा खुलासा त्यांनी केला होता. एका मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या होत्या, “हा चित्रपट केल्यानंतर मला समजले की कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात स्त्रीची भूमिका किती महत्त्वाची असते.” या सुपरहिट चित्रपटात माधुरी दीक्षित, सलमान खान, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे असे अनेक दिग्गज कलाकार महत्वपूर्ण भूमिका दिसले. ५ ऑगस्ट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.