रेखा यांनी नुकतीच अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याची भेट घेतली. मुंबईत राज कपूर यांच्या १००व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या सोहळ्याला बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी आणि कपूर कुटुंबाने महान अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक सेलिब्रिटींमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचाही समावेश होता.

कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रेखा आपल्या बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना आणि कपूर कुटुंबातील सदस्यांना भेटताना दिसत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये रेखा अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेत्री रेखा या अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या कथित प्रेमप्रकरणामुळे आजही चर्चेत असतात. याच कारणामुळे रेखा आणि अगस्त्य नंदाच्या व्हिडीओ व्हायरल झाला अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या

हेही वाचा…100 Years of Raj Kapoor : राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव का होता? ‘आवारा’चा गाजलेला किस्सा काय?

या व्हिडीओत रेखा या सर्वांची भेट घेत असताना त्यांच्यासमोर अगस्त्य नंदा आला आणि रेखा यांनी त्याला मिठी मारली. अभिनेता अगस्त्य नंदाने रेखा यांना हात जोडून अभिवादन केले, तर रेखा यांनी त्याला आशीर्वाद देताना त्याचा चेहऱ्यावरून हात फिरवला. अगस्त्य आपल्या आई श्वेता बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदा यांच्याबरोबर कार्यक्रमाला उपस्थित होता. अगस्त्य आणि नव्या यांचे कपूर कुटुंबाशी नात आहे, राज कपूर यांच्या कन्या रितू नंदा, त्यांच्या आजी आहेत.

कपूर कुटुंबातील रणबीर कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि आलिया भट्ट यांनी राज कपूर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यातून चित्रपटसृष्टीने राज कपूर यांच्याविषयी दाखवलेली आदरभावना स्पष्ट झाली.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या

या कार्यक्रमात रेखा यांनी सुवर्णसदृश साडीत रेड कार्पेटवर येत राज कपूर यांच्या पोस्टरसमोर जाऊन नमस्कार केला. त्यांनी हात जोडले, फोटोला स्पर्श केला आणि आपले डोके खाली झुकवत त्यांना आदरांजली वाहिली. त्या क्षणी काही काळ शांत राहिल्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोज दिली.

हेही वाचा…‘करिश्मा का करिश्मा’ फेम झनक शुक्लाने बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे तिचा पती, काय करतो?

दरम्यान, मुंबईत राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली आहे. राज कपूर यांच्या १००व्या जयंतीनिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कपूर कुटुंबाने राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी १० उत्कृष्ट चित्रपट सादर करणारा हा महोत्सव आयोजित केला आहे. या फेस्टिव्हलमध्ये राज कपूर यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीतले सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जातील, त्यामध्ये ‘आग’ (१९४८), ‘बरसात’ (१९४९), ‘आवारा’ (१९५१), ‘श्री ४२०’ (१९५५), ‘जागते रहो’ (१९५६), ‘जिस देश में गंगा बहती है’ (१९६०), ‘संगम’ (१९६४), ‘मेरा नाम जोकर’ (१९७०), ‘बॉबी’ (१९७३), आणि ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) यांचा समावेश आहे.

Story img Loader