rekha open up after breakup with jeetendra says i am infamous actress who is crazy for sex | “मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य | Loksatta

“मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य

त्यावेळी रेखा आणि जितेंद्र यांचा रोमान्सच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. ‘अनोखी अदा’ चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं होतं की रेखा ढसाढसा रडल्या होत्या

“मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य
'अनोखी अदा' चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं होतं की रेखा ढसाढसा रडल्या होत्या.

बॉलिवूडच्या दमदार कलाकारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अभिनेत्री रेखा फक्त त्यांच्या करिअरमुळेच नाही तर बरेचदा त्यांच्या बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. करिअरच्या आघाडीवर असताना रेखा यांनी स्वतःची अशी एक इमेज बनवली होती जी त्या काळात इतरांच्या पचनी पडणं फारच कठीण होतं. त्यांनी स्वतः बद्दल बोलताना, “मी फक्त एक अभिनेत्री नाही तर बदनाम अभिनेत्री आहे. जिचा भूतकाळ खूपच वाईट आणि ती सेक्ससाठी वेडी आहे असं तिच्याबद्दल बोललं जातं” असंही वक्तव्य केलं होतं. त्यावेळी रेखा एक-दोन नाही तर तब्बल २५ चित्रपटांमध्ये काम करत होत्या आणि त्याही डबल शिफ्टमध्ये. त्यांच्यासारखं काम करणं आजच्या अभिनेत्रीसाठीही जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यावेळी रेखा आणि जितेंद्र यांचा रोमान्सच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. ‘अनोखी अदा’ चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं होतं की रेखा ढसाढसा रडल्या होत्या.

अभिनेत्री रेखा त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर स्वतःच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत होत्या. त्यांच्या या वक्तव्यांची त्यावेळी बरीच चर्चा होती. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकात रेखा यांच्या एका वक्तव्यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलंय की, रेखा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, “तुम्ही एका पुरुषाच्या तोपर्यंत जवळ जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्याबरोबर सेक्स करत नाही.” रेखा यांचं हे वक्तव्य एवढं गाजलं होतं की त्या सेक्ससाठी वेड्या आहेत अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती.

निर्माता बीएन घोष यांनी रेखा यांना आपल्या ‘एक बेचारा’ चित्रपटासाठी कास्ट केलं होतं. ज्यात अभिनेते जितेंद्र मुख्य भूमिकेत होते. याचबरोबर ते रेखा यांच्याबरोबर काम करणारे पहिले ए-लिस्ट अभिनेते होते. त्याआधी रेखा यांनी फक्त बी-लिस्ट कलाकारांबरोबर काम केलं होतं. त्यावेळी चाहत्यांमध्येच नाही तर अनेक अभिनेत्रींमध्येही जितेंद्र यांच्याबद्दल एक वेगळीच क्रेझ होती. ज्यापैकी एक होत्या रेखा. चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना रेखा- जितेंद्र यांच्यात जवळीक वाढली.

आणखी वाचा- Video: लग्नात लाल साडी नेसून रेखा यांचा भन्नाट भांगडा; चेहऱ्यावरचा ‘तो’ एक भाव पाहून नेटकरी फिदा

शिमलाच्या बर्फाळ दऱ्यांमध्ये शूटिंग सुरू असतानाच रेखा आणि जितेंद्र यांच्या रोमान्सचे किस्सेही ऐकायला मिळत होते असं बोललं जातं. अशाही चर्चा होत्या की जितेंद्र यांनीच रेखा यांच्याशी आपली जवळीक वाढवली होती. त्याआधी रेखा यांची इंडस्ट्रीमध्ये खिल्ली उडवली जात होती. पण जितेंद्र यांच्याशी त्यांचं नाव जोडलं गेल्यानंतर लोक त्यांच्याशी व्यवस्थित बोलू लागले होते. यासिर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, जितेंद्र यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर रेखा यांना पहिल्यांदाच प्रेम आणि आदर याची जाणीव झाली. जितेंद्र यांना पाहिल्यानंतर रेखा यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत असे. त्या काळात खरं तर सगळे कलाकार आपलं खासगी आयुष्य गुप्त ठेवण्यावर भर द्यायचे अशा वेळी रेखा तर जितेंद्र यांच्याशी त्यांच्या अफेअरबद्दल बिनधास्त बोलू लागल्या होत्या.

असं म्हटलं जातं की, रेखा यांना त्यावेळी एक वाईट सवय होती. त्या शूटिंगच्या बाबतीत बेजबाबदार होत्या आणि त्यांना अजिबात शिस्त नव्हती. अशात प्रेम आणि रोमान्समध्ये आकंठ बुडालेल्या रेखा यांच्याबरोबर काम करणं फार कठीण जायचं. जेव्हा जितेंद्र आणि रेखा यांना ‘अनोखी अदा’ या चित्रपटासाठी पुन्हा कास्ट करण्यात आलं तेव्हा त्यांच्या लव्ह लाइफमध्ये एक ट्वीस्ट बनून जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा यांची एंट्री झाली. शोभा व्यवसायाने एअर होस्टेस होत्या. जितेंद्र यांच्या मनात तिने स्वतःची जागा बनवली होती. ज्यामुळे जितेंद्र आणि रेखा यांच्या भांडणं होऊ लागली आणि रेखा यांना समजून चुकलं की, जितेंद्र आणि त्यांच्यात फक्त टाइमपास लेव्हलचं नातं राहिलं होतं.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, “मला आजपर्यंत असा पुरुष…”

दोघांच्या नात्यात आलेला दुरावा ‘अनोखी अदा’च्या सेटवर सर्वांनाच दिसून आलं होतं. एकदा तर दोघांमध्ये सेटवरच जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर ज्युनियर कलाकारांच्या समोर जितेंद्र यांनी रेखा यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त करताना ‘टाइमपास’ सारखे शब्द वापरले होते. ज्यामुळे रेखा मेकअप रुममध्ये जाऊन ढसाढसा रडल्या होत्या. दोघांमधील प्रेमाचं नातं संपून गेलं होतं. त्यामुळे या दोघांमधील रोमँटिक सीन्स शूट करणंही कठीण झालं होतं. कसंबसं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. पॅकअप झाल्यानंतर दोघंही एकमेकांना ओळखत नसल्यासारखे निघून जायचे.

यासिर उस्मान यांच्या पुस्तकात एका मुलाखतीचा उल्लेख आहे. ही मुलाखत रेखा यांनी जितेंद्र यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर आपलं दुःख व्यक्त केलं होतं. या मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, “मी त्या माणसाचा तिरस्कार करते. त्याने प्रेम, रोमान्स आणि लग्नाबाबत बालपणापासून जे आदर्श होते ते सगळे आदर्श उद्धस्त केले. मी फक्त एक अभिनेत्री नाही तर बदनाम अभिनेत्री आहे. जिचा भूतकाळ खूपच वाईट आणि ती सेक्ससाठी वेडी आहे असं तिच्याबद्दल बोललं जातं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 09:13 IST
Next Story
“दुसऱ्यांच्या बायकांना खूश करायचं…” वरुण धवनचं वक्तव्य चर्चेत