rhea chakraborty dating bunty sujdeh after sushant singh rajput death | Loksatta

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा प्रेमात पडली रिया चक्रवर्ती; ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

रिया चक्रवती या व्यक्तीच्या प्रेमात; सोनाक्षी सिन्हाबरोबर जोडलं गेलं होतं नाव

rhea chakraborty dating bunty sajdeh
रिया चक्रवर्ती बंटी सजदेहला डेट करत आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड व बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. १४ जून २०२०रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या करत आयुष्य संपवलं होतं. याचा रिया व तिच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागला होता. आता दीड वर्षांनंतर रिया पुन्हा प्रेमात पडली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिया बंटी सजदेहला डेट करत आहे. बंटी हा फॅशन डिझायनर सीमा सजदेह यांचा भाऊ आहे. मनोरंजन व क्रिडा विश्वातील नावाजलेल्या मॅनेजमेंट कंपनीपैकी एका फर्मचा तो मालक आहे. रियाच्या कठीण काळात बंटीने तिला आधार दिल्याचं त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.

हेही वाचा>> लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

“रिया व बंटीला एकत्र आनंदी असणं, ही चांगली गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत कठीण प्रसंगात तो रियाबरोबर खंभीरपणे उभा होता. वाईट काळातही त्याने तिची साथ सोडली नाही” असं जवळच्या व्यक्तीने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं. बंटी व रिया एकमेकांना डेट करत असून सध्या त्यांना त्यांचं रिलेशनशिपबाबत गुपित कायम ठेवायचं आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा>> Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

रियाला डेट करण्याआधी बंटीचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह जोडलं गेलं होतं. बंटी व सोनाक्षी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 12:56 IST
Next Story
“अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश