भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक प्रभावी व दिग्गज अभिनेते म्हणून दिवंगत अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांचे नाव घेतले जाते. राज कपूर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. १४ डिसेंबरला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. ‘गौरी’, ‘चित्तोर विजय’, ‘आग’, ‘मेरा नाम जोकर’, ‘वाल्मीकी’, ‘जेल यात्रा’, ‘दिल की रानी’, ‘मेरा देश मेरा धर्म’, ‘नौकरी’, ‘गोपीचंद जासूस’ अशा अनेक चित्रपटांत राज कपूर यांनी काम केले. अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मितीसुद्धा केली. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे ते वडील होते. ऋषी कपूर यांनी त्यांचे वडील राज कपूर यांच्याबरोबरचे नाते कसे होते, यावर अनेकदा वक्तव्य केले होते. ऋषी कपूर यांनी आत्मचरित्रात याबद्दल उल्लेख करीत लिहिले होते की, लहान असताना त्यांच्या नात्यात तणाव होता. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की, शेवटच्या काही वर्षांत त्यांच्यात खास बॉण्डिंग तयार झाले होते. आता राज कपूर यांची नात व ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाली रिद्धिमा कपूर?

रिद्धिमा कपूरने नुकताच ‘स्क्रीन’बरोबर संवाद साधला. त्यावेळी बोलताना रिद्धिमाने सांगितले, “जेव्हा माझे लग्न झाले, त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना राज कपूर यांच्या सर्व चित्रपटांचे कलेक्शन भेट म्हणून दिले होते. ते कलेक्शन आजही माझ्याजवळ आहे. २००६ मध्ये दिलेली भेट खास होती. माझी मुलगी समाराला मी मेरा नाम जोकर, बूट पॉलिश आणि असे काही चित्रपट दाखवले आहेत. ती आता फक्त १३ वर्षांची आहे. त्यामुळे तिचे लक्ष थोडे विचलित झाले होते. मात्र, मी तिला सांगत असते की, तुझ्या पणजोबांनी असे उत्तम चित्रपट बनवले आहेत आणि ते दिग्गज अभिनेते होते. तिने चित्रपटातील काही भाग पाहिला आहे; मात्र ती किशोरवयीन असल्यामुळे एका ठिकाणी ती सतत बसू शकत नाही. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण चित्रपट पाहत नाही. माझ्या आईचा ‘दो कलियाँ’ हा तिचा आवडता चित्रपट आहे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

‘इफ्फी’मध्ये बोलताना रणबीर कपूरने राज कपूर यांचे दिग्दर्शन जास्त आवडत असल्याचे म्हटले होते. तर तू त्यांचा अभिनय किंवा दिग्दर्शन यांमधील कोणती एक गोष्ट निवडशील? यावर बोलताना रिद्धिमाने म्हटले, “प्रामाणिकपणे सांगायचे, तर मला दोन्ही आवडते. मी त्यांच्या आवारापासून, श्री ४२० ते बूट पॉलिश असे सगळे चित्रपट पाहिले आहेत. ते दिग्दर्शक चांगले होते की अभिनेते चांगले होते हे निवडणे चुकीचे ठरेल. रणबीरप्रमाणे मी एक काहीतरी निवडू शकत नाही. माझ्या मनात ते कायम एक दिग्गज म्हणून राहतील.”

हेही वाचा: शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”

दरम्यान, राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आर. के. फिल्म (R K Films), फिल्म हेरिटेज फाउंडेशन व नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया (NFDC) यांनी एकत्र येत राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने १३ ते १५ डिसेंबरदरम्यान राज कपूर यांचे १० गाजलेले चित्रपट भारतातील ४० शहरांतील १३५ सिनेमांगृहामध्ये दाखविण्यात येणार आहेत.

Story img Loader