Riddhima Kapoor Sahni Neetu Kapoor Dance : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ‘जमाल कूडू’ (Jamal Kuddu) या गाण्याची जादू आजही कायम आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास एक वर्ष उलटून गेलं असलं तरीही या गाण्याचा आकर्षक हुक स्टेप अजूनही चाहत्यांना थिरकायला लावत आहे. फक्त चाहत्यांनाच नव्हे, तर रणबीरच्या कुटुंबीयांनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अलीकडेच रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि आई नीतू कपूर यांनी या गाण्यावर थिरकत एक मजेदार व्हिडीओ शेअर केला.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या प्रदर्शनापासूनच ‘जमाल कूडू’ हे गाणं एक लोकप्रिय झालं. ‘अ‍ॅनिमल’ सिनेमात बॉबी देओलच्या दमदार एंट्रीसह या गाण्याने चाहत्यांच्या मनात ठसा उमटवला आहे. या गाण्याचा जोशपूर्ण ताल आणि आकर्षक हुक स्टेप्स आजही लोकांना वेड लावत आहे, ज्यामुळे सर्वत्र लोक हे स्टेप्स रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ‘जमाल कुडू’च्या स्टेप्स रिक्रिएट करीत डान्स केल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी

हेही वाचा…‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

रिद्धिमा कपूर साहनीने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती आणि तिची आई नीतू कपूर ‘जमाल कूडू’ या गाण्यावर नाचताना दिसतात. या व्हिडीओत रिद्धिमा तिच्या डोक्यावर थाळी ठेवून नाचताना दिसत आहे; तर नीतूही तितक्याच उत्साहात तिला साथ देत आहेत. या व्हिडीओत रिद्धिमा चमकदार मरून रंगाच्या टॉपमध्ये, तर काळ्या लांब स्कर्टमध्ये दिसत आहे. तर, नीतू कपूर पांढऱ्या पोशाखात अप्रतिम दिसत आहेत. या पोस्टला रिद्धिमाने ‘माझ्या मम्मीबरोबर डान्स फ्लोअरवरच चांगले वाइब्स येतात’, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा…आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

रिद्धिमा कपूर २००६ मध्ये व्यवसायिक भरत साहनीशी विवाहबंधनात अडकली. रिद्धिमा कपूर साहनी एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे.अलीकडेच ती नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलीवूड वाइव्ह्ज’ या सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिच्यासह माहीप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे, सीमा सजदेह, शालिनी पासी व कल्याणी साहा चावला यांनी सहभाग घेतला होता.

Story img Loader