Rishi Kapoor : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, त्यांना खऱ्या अर्थाने ओळख ‘बॉबी’ चित्रपटामुळे मिळाली. ‘बॉबी’मुळे ऋषी कपूर रातोरात सुपरस्टार झाले होते. यामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ऋषी आणि डिंपल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटामुळे दोघंही रातोरात सुपरस्टार झाले, एवढंच नव्हे तर दोघांच्या डेटिंगच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.

पुढे, वैयक्तिक आयुष्यात डिंपल यांनी १९७३ मध्ये सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं. अभिनेत्री तेव्हा फक्त १६ वर्षांच्या होत्या. ऋषी कपूर यांच्या मनात डिंपल यांच्याबद्दल कधीच रोमँटिक भावना नव्हत्या. पण, तरीही राजेश खन्ना त्यांना फारसे रुचायचे नाहीत. याबाबत NDTV वर पत्रकार बरखा दत्त यांच्याशी संवाद साधताना ऋषी कपूर यांनी खुलासा केला होता.

Somy Ali on salman khan aishwarya rai relation
“ती सलमानबरोबर असताना…”, भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचं ऐश्वर्या रायबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई हा…”
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

ऋषी कपूर यांची तेव्हाची गर्लफ्रेंड यास्मिनने त्यांना एक अंगठी गिफ्ट केली होती. ‘बॉबी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल यांनी ऋषी कपूर यांच्याकडून ती अंगठी मागितली आणि स्वत:च्या हातात घातली. त्यानंतर डिंपल यांनी ती अंगठी स्वत:कडेच ठेवली. पण, त्यानंतर राजेश खन्ना यांनी डिंपलला प्रपोज केलं. तेव्हा सुद्धा ती अंगठी डिंपलच्या हातात होती. राजेश खन्ना यांनी डिंपलच्या बोटात अंगठी पाहिल्यावर ते प्रचंड नाराज झाले होते आणि त्यांनी चिडून ती अंगठी काढून फेकून दिली होती.

हेही वाचा : दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

ऋषी कपूर या घटनेबद्दल सांगताना म्हणाले होते, “मला ते पसंत नव्हते कारण, त्यांनी माझ्या चित्रपटाची पहिली हिरोइन माझ्यापासून दूर केली. त्यांनी डिंपलबरोबर लग्न केलं तेव्हा तिने नुकतीच इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली होती. बाकी आमच्यात इतर कोणतेही वाद नाहीत. मी त्यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय आणि मी दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटामध्ये त्यांनी देखील भूमिका साकारली होती. पण, ही अंगठीची गोष्ट खरी आहे. त्या अंगठीवर ‘पीस’चं ( शांतता ) चिन्ह होतं. ती अंगठी फार महागडी नव्हती. पण, त्याने फरक नाही पडत…प्रेम महत्त्वाचं असतं.”

गर्लफ्रेंडने दिलेली अंगठी तुम्ही डिंपल यांना घेऊ कशी दिली? याबद्दल विचारलं असता ऋषी कपूर पुढे म्हणाले होते, “डिंपलने ती अंगठी माझ्याकडून पळवून नेली होती.” राजेश खन्ना यांनी ती अंगठी फेकून दिल्यामुळे आपण नाराज झाल्याचं ऋषी कपूर यांनी या मुलाखतीत कबूल केलं होतं. “माझी अंगठी गेली, माझ्या पहिल्या हिरोइनला घेऊन गेले, त्यामुळे नाराज होण्याची माझ्याकडे अनेक कारणं होती” असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, डिंपलबद्दल कधीच रोमँटिक भावना नव्हत्या, मी फक्त पझेसिव्ह होतो असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो

दरम्यान, राजेश खन्ना यांच्याशी लग्न झाल्यावर डिंपल यांनी अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली होती. कालांतराने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केल्यावर त्यांनी ऋषी कपूर यांच्याबरोबर पुन्हा एकदा ‘अजूबा’, ‘सागर’, ‘रणभूमी’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं.

Story img Loader