रणबीर कपूर व आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या बहुचर्चित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ४०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांनी मनं जिंकली. या चित्रपटाला बनवण्यासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी याला तब्बल ८ वर्षांहून अधिक काळ लागला होता. ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच रणबीर व ऋषि कपूर यांच्यात खूप वाद होत असतं; याचा खुलासा स्वतः रणबीर कपूरने अलीकडे झालेल्या एका मुलाखतीतून केला आहे.

रणबीर म्हणाला की, “मी ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाबाबत खूप उत्साहित होता. या चित्रपटात मी आलियाबरोबर काम करत होतो. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास होता. पण या चित्रपटाच्या शूटिंगला लागणारा वेळ पाहून बाबा, ऋषी कपूर खूप चिडायचे. तुम्ही तुमचा वेळ व्यर्थ घालवत आहात. हा चित्रपट चालणार नाही, असं सतत सांगायचे.”

Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Buldhana, Cinestyle chase, money looted,
बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…
PMC companies contributed crores from CSR funds is unused
सात कोटींची रक्कम पालिकेकडे पडून? नक्की काय आहे प्रकार
Hallmark certification of silver purity made mandatory soon
चांदीच्या दागिन्यांची अस्सलता तपासणे होईल सोपे; सोन्याप्रमाणेच शुद्धतेच्या हॉलमार्क प्रमाणनाची सक्ती लवकरच 
karvaan movie china box office record
‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ नाही तर ‘या’ चित्रपटाने चीनमध्ये विकलेली ३० कोटी तिकीटे, अजूनही अबाधित आहे विक्रम
actor gurmeet choudhary diet plan
दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
kanguva actor surya and jyothika in shaitan
३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप

हेही वाचा – “काश्मिरी पंडितांचं नेमकं सत्य काय होतं?” विवेक अग्निहोत्री घेऊ येतायत ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’; पाहा ट्रेलर

“अयान आणि माझ्याबरोबर बाबा खूप वाद घालतं असतं. तुम्ही काय करताय? चित्रपट बनवण्यासाठी इतका वेळ कोण घेत? आणि एवढे पैसे कोण खर्च करत? असं सतत आम्हाला बोलत असतं. मला तर नेहमी बोलायचे, रणबीर तू या चित्रपटाच्या माध्यमातून एकही रुपया कमवू शकणार नाही. वीएफफक्सचे चित्रपट कोण पाहत? भारतात तर कोणचं वीएफएक्स चित्रपट पाहत नाहीत?,” असं सांगत रणबीरने ऋषी कपूर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा – “स्टंट कर…”, ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये जखमी झालेल्या शिव ठाकरेला आईने दिलेला सल्ला

हेही वाचा – आता मोठ्या पडद्यावर बिग बी साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका? चित्रपटाची कहाणी काय असणार जाणून घ्या

दरम्यान, रणबीरच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, ‘अ‍ॅनिमल’ या आगामी चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

Story img Loader