Rita Bhaduri Unmarried: ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांची भूमिका असलेले अनेक सिनेमे गाजले. ‘लव्ह’, ‘ज्युली’, राजा, गोपाल कृष्णा, फूलन देवी अशा अनेक सिनेमांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी अनेक मालिकांतही काम केले. त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत होत्या.
अभिनेत्रीने शाहरुख खान, माधुरी दीक्षितबरोबर केलेलं काम
रीटा भादुरी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५५ रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झाला. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट १९६८ साली प्रदर्शित झाला. ‘तेरी तलाश में’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी ‘सावन को आने दो’, ‘गोपाल कृष्ण’, ‘ज्युली’, ‘अनुरोध’, ‘आई मिलन की रात’ व ‘राजा’ यांसारख्या जवळपास ७० चित्रपटांमध्ये काम केले.
रीटा भादुरी यांनी आईच्या भूमिका साकारल्या. त्या भूमिकांतून त्यांना लोकप्रियताही मिळाली. शाहरुख खान आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या कभी हाँ कभी ना या सिनेमाबरोबरच रीटा यांनी ‘क्या कहना’, ‘दिल विल प्यार व्यार’ व ‘राजा’सारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारल्या होत्या.
मोठ्या पडद्यावर आईची भूमिका साकारणाऱ्या रीटा यांनी छोट्या पडद्यावरील ‘निमकी मुखिया’ या शोमध्ये आजीची संस्मरणीय भूमिका साकारली होती. तिने साराभाई व्हर्सेस साराभाई, अमानत, कुमकुम भाग्य, भागवाली – बातें अपनी तकदीर, हद कर दी, वो रहने वाली महलों की, छोटी बहू, बानी – इश्क दा कलमा, एक नई पहचान, हम सब बाराती यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.
रीटा भादुरी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्या आजन्म अविवाहित राहिल्या. त्यांनी लग्न केलेले नव्हते. १७ जुलै २०१८ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी रीटा यांचे निधन झाले.
रीटा यांनी त्यांच्या कारकिर्दीत शाहरुख खानबरोबरच माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रवीना टंडन, गोविंदा, कमल हासन अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केले आहे.
