गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहात, जल्लोषात घरोघरी गणरायचं स्वागत होतं आहे. बॉलीवूड आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे. यंदा देशमुखांच्या बाप्पाच्या मूर्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही मूर्ती घडवण्यात रितेश-जिनिलीयाची मुलं रियान आणि राहिल यांनी हातभार लावला आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘जवान’च्या सेटवर पहिल्या दिवशी ‘असा’ होता दीपिका पदुकोणचा लूक; दिग्दर्शक अ‍ॅटली म्हणाला, “कोणत्याही अभिनेत्रीला…”

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

रितेश देशमुखच्या घरी दरवर्षी गणपतीसाठी विविध प्रकारची सजावट केली जाते. यंदा देशमुख कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. रियान आणि राहिलचा मूर्ती घडवतानाचा आणि मराठीतून बाप्पाची आरती गातानाचा खास व्हिडीओ रितेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “खूप धाडस करुन हे पाऊल उचलते…” ‘ रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचं नव्या क्षेत्रात पदार्पण

यंदाच्या गणेशोत्सवासाठी रितेशसह त्याच्या मुलांनी बाप्पाची खास रिसायकल मूर्ती बनवून त्याची मनोभावे पूजा केली. बाप्पाच्या या अनोख्या मूर्तीची झलक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी देशमुख कुटुंबीय या मूर्तीची मनोभावे पूजा करताना दिसतात. अभिनेता या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहितो, “गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतो. रियान आणि राहिलच्या आग्रहामुळे यंदा रिसायकल थीमने मूर्ती घडवली.”

हेही वाचा : “कठोर निर्णय घ्यावे लागले”, अद्वैत दादरकरने सोडलं ‘झी मराठी’, पोस्ट शेअर करत म्हणाला, “धडपडलो, भांडलो…”

दरम्यान, रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “रियान आणि राहिलवर खूप चांगले संस्कार केले आहेत.”, “खूप छान आरती म्हणता बाळा तुम्ही दोघं”, “रितेश-जिनिलीया कायमचं वेगळं काहीतरी करून मन जिंकतात” अशा असंख्य कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.