सध्या सगळीकडे गणपतीचा गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. अनेक जण एकमेंकांच्या घरी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. कलाकारही इतरांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- आदित्य ठाकरेंनी शेअर केले परिणीती चोप्रा-राघव चड्ढांच्या लग्नातील Unseen Photos, लूकने वेधलं लक्ष

रितेश आणि जेनिलियाने यांनी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि नंतर मुख्यमंत्री शिंदेंबरोबर फोटोही काढला. दरम्यान रितेशने याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी रितेशने शर्ट पॅन्ट घातली होती तर जेनिलिया रंगाच्या पारंपारिक लूकमध्ये दिसून आली. यावेळी एकनाथ शिंदेंबरोबर त्यांची पत्नीही हजर होती.

हेही वाचा- नाना पाटेकरांनी सांगितलं राग येण्यामागचं कारण; म्हणाले, “तुमची पात्रता…”

रितेश आणि जेनिलियाच्या अगोदर अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि शाहरुख खानने वर्षा’ निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागतही केले. यावेळेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे आर्शिवाद घेतले.

कलाकारांबरोबर अनेक राजकीय नेत्यांही बाप्पाच्या दर्शनासाठी ‘वर्षा’ निवासस्थानावर हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं. राज ठाकरेंच्या हस्ते गणपतीची आरतीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे हे मागच्या वर्षीही गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही रविवारी वर्षा या निवासस्थानी येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia at maharashtra cm eknath shinde home for ganpati darshan photo viral dpj
Show comments