Actor Riteish Deshmukh shares birthday post for brother Dhiraj Deshmukh : रितेश देशमुख हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेता सध्या त्याच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहे.

रितेश देशमुख अभिनयासह सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्या मार्फत त्याची बायको अभिनेत्री जिनिलीया देशमुखबरोबरचे अनेक विनोदी रील्स व्हिडिओ तो पोस्ट करत असतो. अभिनेता यामार्फतच्या दैनंदिन जीवनातील अपडेटसुद्धा चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अशातच आता त्यानं त्याच्या भावासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुखला दोन भाऊ आहेत. अमित देशमुख हे राजकारणात सक्रिय असून रितेश देशमुखचे ते थोरले भाऊ आहेत. धीरज देशमुखसुद्धा राजकारणात सक्रिय असून रितेश देशमुखचे धाकटे भाऊ आहेत. अशातच रितेशनं भाऊ धीरज यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. धीरज विलासराव देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त रितेशनं त्यांच्याबरोबरचा एक जुना फोटो पोस्ट केलाय.

Award Banner

रितेश देशमुखची पोस्ट

रितेशनं इंस्टाग्रामवर भावाबरोबरचा फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश या पोस्टमधून म्हणाला, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धीरज. तू एक उत्कृष्ट मुलगा, वडील, नवरा, एक उत्तम मित्र आणि एक चांगला भाऊ आहे. आज आणि उद्या कायमच तुझ्याबरोबर सगळं चांगलं घडो अशी मी प्रार्थना करतो. देव करो तू कायम निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहावे.”

रितेश देशमुख व जिनिलीया कायमच त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडिओ पोस्ट करत असतात. रितेश जिनिलीया अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांबरोबर सण साजरे करत असतात. रितेश व त्याचे भाऊ, त्याच्या वहिनी आणि त्यांच्या घरातील लहान मुलं या सर्वांचे एकत्रित फोटो व व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच अभिनेत्याच्या ‘राजा शिवाजी’ या बिग बजेट चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गेली दहा वर्षे तो हा चित्रपट बनवण्याचं स्वप्न पाहत होता आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून यावर तो काम करत आहे. असं म्हटलं आहे. रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ या रितेश देशमुख लिखित, दिग्दर्शित, आणि निर्मित चित्रपटात मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. रितेश व जीनीलिया यांच्याबरोबर चित्रपटात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री पटवर्धन यांसारखे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.