बॉलीवूडसह मराठी मनोरंजनसृष्टीतली लोकप्रिय जोडी म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. या जोडीला इंडस्ट्रीत आदर्श जोडी मानलं जातं. रितेश-जिनिलिया नेहमीच त्यांच्या मजेशीर रिल्समुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही दोघं चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. अशातच रितेशने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

रितेश-जिनिलिया नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशातच रितेशने नुकतीच एक नवीन रील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात रितेशने सफेद रांगाचा सदरा आणि त्यावर राखाडी रंगाचा कोट परिधान केलाय. तर जिनिलिया काळ्या रंगाच्या नाईट सूटमध्ये दिसतेय. व्हिडीओ सुरू होताच रितेश म्हणतो, “अच्छा तुला काय वाटतं यावेळेस निवडणूक कोण जिंकेल.” यावर मजेशीर प्रतिक्रिया देत जिनिलिया त्याला म्हणते, “अरे कोणीही जिंकूदे, तुमच्यावर तर मीच राज्य करणार आहे.” हे ऐकताच रितेश त्याचे हावभाव बदलतो.

genelia deshmukh celebrate vat purnima
Video : “माझे प्रिय नवरोबा”, देशमुखांच्या सुनेची वटपौर्णिमा! जिनिलीया म्हणते, “रितेश तुम्हाला माझं आयुष्य…”
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
virat kohli daughter vamika biggest concern after India won t20 worldcup
“खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
marathi actress Kranti Redkar told the story of her girl
Video: “जर तू मेलीस तर मी…”; लेकीच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने क्रांती रेडकरला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “तीन फुटांची पण नाहीये…”

“अब की बार नही… हर बार बीवी की सरकार… निवडणूक २०२४” असं कॅप्शन रितेशने या व्हिडीओला दिलं आहे. रितेश जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… Fathers Day: नुकत्याच बाबा झालेल्या वरुण धवनने शेअर केला लेकीबरोबर खास फोटो, म्हणाला, “मुलीचा बाबा…”

व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर रितेश- जिनिलियाच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “कसं.. वहिनी म्हणतील तसं !!” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “घरातील होम मिनिस्टर” एका युजरने दोघांना “नंबर वन जोडी” म्हटलं आहे. तर एक जण म्हणाला, “हर बार जिनिलिया सरकार”, अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… “शेवटी नैनाने तिच्या तालावर…”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अपुर्वा सकपाळ व ध्रुव दातार यांचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स, चाहते म्हणाले…

गेल्या महिन्यापासून देशभरात लोकसभा निवडणूक वातावरण होतं. रितेश आणि जिनिलियानेदेखील लातूर येथील बाभळगाव मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा… …म्हणून सोनाक्षी सिन्हाबरोबर झाला होता ब्रेकअप? अर्जुन कपूरने केला खुलासा; म्हणाला, “काही नाती…”

दरम्यान, रितेश जिनिलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच रितेश ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे, तर अभिनेत्री जिनिलिया देशमुख आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. लवकरच हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.