प्रसिद्ध चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. रितेश व वाशू भगनानी हे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांचं कौटुंबीक नातं आहे. रितेशने शेअर केलेल्या स्टोरीने लक्ष वेधलं आहे.

वाशू भगनानी हे रितेश देशमुखच्या भावाचे सासरे आहेत. लातुर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख हे वाशू भगनानी यांचे जावई आहेत. रितेश देशमुखची वहिनी दिपशिखा देशमुख पूजा व वाशू यांची मोठी मुलगी आहे. दिपशिखा जॅकी भगनानीची मोठी बहीण आहे. वाशू भगनानी यांच्या वाढदिवसानिमित्त रितेशने त्यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

२५ एप्रिलला मंदिरात लग्न करणार प्रसिद्ध अभिनेत्री, व्यावसायिकाशी ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज

रितेश देशमुखची इन्स्टाग्राम स्टोरी

रितेश देशमुखची भगनानी व रकुल प्रीतशी मैत्री आहे. फेब्रुवारीत या जोडप्याने गोव्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला धिरज देशमुख व दिपशिखा देशमुख यांच्याबरोबरच रितेश व त्याच्या आईनेही हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.