Genelia & Riteish Deshmukh Funny Video : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून रितेश-जिनिलीयाकडे पाहिलं जातं. आजची तरुणपिढी त्यांच्याकडे ‘Couple Goals’ म्हणून पाहते. रितेश-जिनिलीयाने आजवर अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की, ते एकमेकांचे जोडीदार आहेतच पण, त्याआधी ते एकमेकांचे खूप छान मित्र आहे. त्यामुळे अनेकदा रितेश रील्स व्हिडीओमध्ये जिनिलीयाची चेष्टा करताना दिसतो. अभिनेत्याने नुकताच ‘आय लव्ह My Wife’ म्हणत एक खास मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
जिनिलीया व रितेश देशमुख यांचे Reels व्हिडीओ चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत असतात. अभिनेता या व्हिडीओमध्ये म्हणतो, “I Love My बायको, My Wife…माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या वाईट काळात सुद्धा हिने मला नेहमीच साथ दिलीये… कारण, तो वाईट काळ सुद्धा हिच्यामुळेच आला होता.”
रितेशचं हे बोलणं ऐकून जिनिलीया त्याच्याकडे शॉक होऊन पाहू लागते आणि रुसून त्याला ‘तू असं का म्हणालास’ असा जाब त्याला विचारू लागते असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अवघ्या एक तासात या व्हिडीओला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
रितेशने या व्हिडीओला ‘आय लव्ह माय बायको’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “दादा आमच्या वहिनी भारी आहेत…आमचा जीव आहेत”, “बेस्ट कपल ऑफ बॉलीवूड”, “फेव्हरेट जोडी”, “नवरा-बायको असावेत तर असे”, “Cutest Couple”, “बेस्ट कपल”, “रितेश सर भन्नाट व्हिडीओ” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, जिनिलीया लवकरच ‘Gunmaaster G9’ या सिनेमात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय रितेश-जिनिलीया दोघंही १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेशने केलं असून, जिनिलीयाने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या रियान व राहील या दोन्ही मुलांनी सिनेविश्वात पदार्पण केलं आहे.
