Premium

“जिनिलीया वहिनींचा दरारा आहे”, रितेश देशमुखच्या ‘त्या’ व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस, स्वतःच म्हणाला, “लग्न झाल्यानंतर…”

रितेश देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?

Riteish and Genelia viral video
रितेश देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?

कलाक्षेत्रातील आदर्श जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख. रितेश व जिनिलीयाकडे पाहिलं की, त्यांचा अगदी हेवा वाटतो. लग्नाला १० वर्षे उलटून गेली तर त्या दोघांच्या नात्यामधील गोडवा काही कमी झालेला नाही. सोशल मीडियाद्वारे तर दोघंही त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसतात. इतकंच नव्हे तर रितेश व जिनिलीयाच्या रिल व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिल व्हिडीओद्वारे चाहत्यांचं अधिकाधिक मनोरंजन करणं रितेश व जिनिलीयाला आवडतं. या दोघांचे हे व्हिडीओ बरेच व्हायरल होतात. आताही रितेशने शेअर केलेला एक रिल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हा व्हिडीओ एका सेटवरचा आहे. व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट रितेशला मेकअप करताना दिसत आहे.

आणखी वाचा – भाड्याच्या घरात राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, घरभाडं किती? हेही सांगितलं अन्…

रितेशने मेकअप करत असताना कानाजवळ फोन पकडला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये एका महिलेचे संवाद ऐकायला मिळत आहेत. “झाली की नाही कामावरुन सुट्टी? दिसतो की नाही घरचा रस्ता. लवकर घराकडे निघा. नाहीतर घरी आल्यावर काय ते बघावं लागेल”. असा आवाज या व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे.

आणखी वाचा – चार चित्रपट करुनही काम मिळेना, शेवटी नोकरी केली पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “माझा पगार…”

रितेशने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “लग्न झाल्यानंतर…”. मराठीमध्ये त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी त्याच्या या व्हिडीओवर अनेक गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. एका वाघाची शिकार एका हरणीने केली, तुम्हाला पण वहिनी दम देतात का?, भाऊ माझी पण अशीच हालत आहे, जिनिलीया वहिनींचा दरारा अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 14:28 IST
Next Story
“माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ…”, पोस्ट शेअर करत काजोल देवगणने सोशल मीडियावरील सगळे फोटो केले डिलीट